मराठी बातम्या  /  धर्म  /  Shani Dev : शनिची अवकृपा टाळायची असेल तर चुकूनही करू नका या गोष्टी

Shani Dev : शनिची अवकृपा टाळायची असेल तर चुकूनही करू नका या गोष्टी

May 09, 2023, 01:27 PM IST

  • Don'ts For Shani Prakop : काही गोष्टी अशा आहेत ज्याने शनिदेव नाराज होतात. काही अशा गोष्टी ज्या कळत किंवा नकळत आपल्या हातून होत असतील तर त्या गोष्टी करणं आपण थांबवलं पाहिजे अन्यथा तुमच्यावर शनिदेवाचा कोप झालाच असं समजा.

शनिदेव (Freepik)

Don'ts For Shani Prakop : काही गोष्टी अशा आहेत ज्याने शनिदेव नाराज होतात. काही अशा गोष्टी ज्या कळत किंवा नकळत आपल्या हातून होत असतील तर त्या गोष्टी करणं आपण थांबवलं पाहिजे अन्यथा तुमच्यावर शनिदेवाचा कोप झालाच असं समजा.

  • Don'ts For Shani Prakop : काही गोष्टी अशा आहेत ज्याने शनिदेव नाराज होतात. काही अशा गोष्टी ज्या कळत किंवा नकळत आपल्या हातून होत असतील तर त्या गोष्टी करणं आपण थांबवलं पाहिजे अन्यथा तुमच्यावर शनिदेवाचा कोप झालाच असं समजा.

शनिला न्याय करणारी देवता असं मानलं जातं. म्हणूनच शनिला कर्मफलदाता या नावानेही ओळखलं जातं. शनिच्या याच गुणांमुळे शनिला काही बाबतीत क्रूर असंही म्हटलं जातं. शनि ज्याच्यावर प्रसन्न असतो, त्या व्यक्तीला कोणत्याच गोष्टीची कमतरता नसते. अशी व्यक्ती आयुष्यात सर्वात सुखी व्यक्ती असते. मात्र ज्या व्यक्तीवर शनिदेव आपली अवकृपा करतात ती व्यक्ती क्षणात रावाचं रंक होते. म्हणूनच शनिदेवाला खुश करणं किंवा खुश ठेवणं याला आपलं प्राधान्य असलं पाहिजे.

ट्रेंडिंग न्यूज

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

Rashichakra : 'या' तीन राशी फालतू खर्च करण्यात शीर्षस्थानी, अशा प्रकारे सुधारू शकते त्यांची आर्थिक बाजू

काही गोष्टी अशा आहेत ज्याने शनिदेव नाराज होतात. काही अशा गोष्टी ज्या कळत किंवा नकळत आपल्या हातून होत असतील तर त्या गोष्टी करणं आपण थांबवलं पाहिजे अन्यथा तुमच्यावर शनिदेवाचा कोप झालाच असं समजा. कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्याने शनिचा कोप आपल्यावर होऊ शकतो.

एखाद्याकडून पैसे उधार घेऊनही ते देणं मुद्दाम टाळणं

आपल्याला कधी पैशाची जास्त गरज भासते. अशावेळेस आपण आपल्या एखाद्या नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे घेतो आणि आपली गरज भागवतो. मात्र बऱ्याच व्यक्ती अशा असतात, ज्यांनी उधार घेतले आहेत, मात्र आपल्याकडे पैसे आल्यावरही त्या व्यक्ती पैसे चुकवत नाहीत, अशा व्यक्तींवर शनिची अवकृपा होते.

पैसे प्रचंड प्रमाणात साठवून ठेवणं

काही कंजूष प्रवृत्तीची माणसं या समाजात पाहायला मिळतात. घरात आलेल्या पैशाला ते साठवतात, मात्र त्यांना कधीच खर्च करत नाहीत. वास्तविक लक्ष्मी प्रवाही मानली गेली आहे. अशी लोकं आपल्या धनसंचयासाठी इतरांना त्रास देतात, अशा व्यक्तींवर शनि महाराज अवकृपा करतात.

बसल्या बसल्या पाय हलवणे

बसल्या बसल्या पाय हलवणं शास्त्रीयदृष्ट्याही वाईट मानलं गेलं आहे. धार्मिकदृष्ट्या याला अशुभ गोष्ट मानली गेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीने पाय हलवल्यास शनिदेव नाराज होतात

घरात उष्टी भांडी ठेवल्यास

अनेकांच्या घरात आपण रात्रीच्या जेवणाची भांडी तशीच ठेवलेली पाहातो. अशा लोकांचं स्वयंपाकघर स्वच्छ नसतं. त्यामुळे अशा ठिकाणी नकारात्मकता पसरते असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं गेलं आहे. याशिवाय काही घरात बाथरुमही अस्वच्छ पाहायला मिळतं इथेही शनि आपली अवकृपा करतात.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या