मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WPL 2024 : मेग लॅनिंगची दिल्ली प्ले ऑफमध्ये, आता आरसीबीसाठी असं आहे समीकरण, पाहा

WPL 2024 : मेग लॅनिंगची दिल्ली प्ले ऑफमध्ये, आता आरसीबीसाठी असं आहे समीकरण, पाहा

Mar 11, 2024, 12:03 PMIST

WPL 2024 Play Offs Equation : महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा १ धावाने पराभव केला आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मुंबई इंडियन्सही प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. केवळ ३ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. प्लेऑफसाठी आता युपी आणि आरसीबी यांच्यात चुरस रंगली आहे.

  • WPL 2024 Play Offs Equation : महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सने आरसीबीचा १ धावाने पराभव केला आणि प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. मुंबई इंडियन्सही प्लेऑफसाठी पात्र ठरली आहे. केवळ ३ संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकतात. प्लेऑफसाठी आता युपी आणि आरसीबी यांच्यात चुरस रंगली आहे.
WPL च्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेला संघ थेट फायनलसाठी पात्र ठरतो. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळवला जाईल. यातील विजेता फायनल खेळले. चालू हंगामात दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. त्याचवेळी आरसीबी आणि यूपी वॉरियर्सच्या यांच्यात प्लेऑफसाठी चुरस रंगली आहे. आता या संघांसाठी काय समीकरण तयार होत आहे? ते जाणून घेऊया.
(1 / 6)

दोन संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले-  WPL 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये दिल्ली कॅपिटल्स पहिल्या स्थानावर आहे. दिल्लीने आतापर्यंत ७ सामने खेळले असून त्यापैकी ५ सामने जिंकले आणि २ सामने गमावले. संघाचे १० गुण आहेत आणि त्यांचा नेट रनरेट ०.९१८ आहे. 
(2 / 6)

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईनेही आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत, ज्यात ५ जिंकले आहेत आणि २ गमावले आहेत. संघाचे १० गुण आहेत. पण मुंबईचा नेट रनरेट दिल्ली कॅपिटल्सपेक्षा कमी आहे. मुंबईचा रन रेट नेट ०.३४३ इतका आहे.
(3 / 6)

या दोन संघांमध्ये चुरस- गुणतालिकेत आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे. या संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि ४ गमावले आहेत. त्यांचा नेट रनरेट ०.०२७ आहे. संघाचे ६ गुण आहेत. दुसरीकडे, यूपी वॉरियर्स संघ चौथ्या स्थानावर आहे. वॉरियर्सचेही ६ गुण आहेत. पण त्याचा नेट रनरेट उणे ०.३६५ इतका आहे.
(4 / 6)

प्लेऑफमध्ये जाण्यासाठी समीकरण- आता युपी आणि आरसीबी यांचा प्रत्येकी एक सामना बाकी आहे. यूपी वॉरियर्सचा सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे. तर आरसीबीचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आरसीबीला मुंबईविरुद्धचा सामना कोणत्याही किंमतीत मोठ्या फरकाने जिंकावा लागेल.
(5 / 6)

तसेच, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी यूपी वॉरियर्सला गुजरातविरुद्धचा सामना जिंकावाच लागेल आणि आरसीबीचा संघ मुंबईविरुद्धचा पराभूत होईल. अशी प्रार्थनाही करावी लागेल. जेणेकरून त्यांचे आरसीबीपेक्षा जास्त गुण होतील.
(6 / 6)

    शेअर करा