मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  आरसीबीवर पैशांचा पाऊस, ऑरेंज कॅप-पर्पल कॅप कोणाला? पाहा WPL पुरस्कारांची यादी

आरसीबीवर पैशांचा पाऊस, ऑरेंज कॅप-पर्पल कॅप कोणाला? पाहा WPL पुरस्कारांची यादी

Mar 18, 2024, 12:07 PMIST

WPL 2024 Award winners List : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. टूर्नामेंट जिंकल्यानंतर आरसीबीवर पैशांचा पाऊस पडला. त्याचवेळी दिल्लीला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे, मानाची पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप आरसीबीच्याच दोन खेळाडूंनी जिंकली.

  • WPL 2024 Award winners List : रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने महिला प्रीमियर लीगच्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. टूर्नामेंट जिंकल्यानंतर आरसीबीवर पैशांचा पाऊस पडला. त्याचवेळी दिल्लीला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. विशेष म्हणजे, मानाची पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप आरसीबीच्याच दोन खेळाडूंनी जिंकली.
इमर्जिंन प्लेयर ऑफ द सीझन- ५ लाख रू.-   श्रेयंका पाटीला इमर्जिंन प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कारही मिळाला. 
(1 / 6)
इमर्जिंन प्लेयर ऑफ द सीझन- ५ लाख रू.-   श्रेयंका पाटीला इमर्जिंन प्लेयर ऑफ द सीझनचा पुरस्कारही मिळाला. 
 पर्पल कॅप विजेता ५ लाख रू. - आरसीबीच्या श्रेयंका पाटीलने महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये सर्वाधिक १३ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली. अंतिम सामन्यात श्रेयंकाने ४ विकेट घेतल्या. 
(2 / 6)
 पर्पल कॅप विजेता ५ लाख रू. - आरसीबीच्या श्रेयंका पाटीलने महिला प्रीमियर लीग २०२४ मध्ये सर्वाधिक १३ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली. अंतिम सामन्यात श्रेयंकाने ४ विकेट घेतल्या. 
 ऑरेंज कॅप- ५ लाख रू. -  रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या एलिस पेरीने ऑरेंज कॅप जिंकली. तिने ९ सामन्यांमध्ये सर्वाधिक एकूण ३४१ धावा केल्या. पेरीने ६९.४ च्या उल्लेखनीय सरासरीने फलंदाजी केली. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग दुसऱ्या स्थानावर राहिली.
(3 / 6)
 ऑरेंज कॅप- ५ लाख रू. -  रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या एलिस पेरीने ऑरेंज कॅप जिंकली. तिने ९ सामन्यांमध्ये सर्वाधिक एकूण ३४१ धावा केल्या. पेरीने ६९.४ च्या उल्लेखनीय सरासरीने फलंदाजी केली. दिल्लीची कर्णधार मेग लॅनिंग दुसऱ्या स्थानावर राहिली.
सर्वात मौल्यवान खेळाडू ५ लाख रू. - युपी वॉरियर्सच्या दीप्ती शर्माने स्पर्धेतील तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी MVP पुरस्कार (मोस्ट व्हॅल्युबल प्लेयर) जिंकला. दीप्ती शर्माने बॅट आणि बॉल या दोहोंमध्ये चमत्कार केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एकाच T20 सामन्यात अर्धशतक आणि हॅटट्रिक करणारी ती महिला क्रिकेट इतिहासातील पहिली महिला खेळाडूही ठरली.
(4 / 6)
सर्वात मौल्यवान खेळाडू ५ लाख रू. - युपी वॉरियर्सच्या दीप्ती शर्माने स्पर्धेतील तिच्या अष्टपैलू कामगिरीसाठी MVP पुरस्कार (मोस्ट व्हॅल्युबल प्लेयर) जिंकला. दीप्ती शर्माने बॅट आणि बॉल या दोहोंमध्ये चमत्कार केला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एकाच T20 सामन्यात अर्धशतक आणि हॅटट्रिक करणारी ती महिला क्रिकेट इतिहासातील पहिली महिला खेळाडूही ठरली.(PTI)
प्लेयर ऑफ द फायनल - आरसीबीची सोफी मोलिनक्स प्लेयर ऑफ द फायनल ठरली. तिला २.५ लाखांचे बक्षीस मिळाले. सोफीने फायनलमध्ये एकाच षटकात शेफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमीमाह रॉड्रिग्स यांची विकेट काढली. यातून दिल्लीला सावरता आले नाही.
(5 / 6)
प्लेयर ऑफ द फायनल - आरसीबीची सोफी मोलिनक्स प्लेयर ऑफ द फायनल ठरली. तिला २.५ लाखांचे बक्षीस मिळाले. सोफीने फायनलमध्ये एकाच षटकात शेफाली वर्मा, एलिस कॅप्सी, जेमीमाह रॉड्रिग्स यांची विकेट काढली. यातून दिल्लीला सावरता आले नाही.(PTI)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने महिला प्रीमियर लीग २०२४ च्या फायनलमध्ये (WPL 2024) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पराभव केला. टूर्नामेंट जिंकल्यानंतर आरसीबीवर पैशांचा पाऊस पडला. आरसीबीला ६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याचवेळी दिल्लीला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. 
(6 / 6)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने महिला प्रीमियर लीग २०२४ च्या फायनलमध्ये (WPL 2024) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) पराभव केला. टूर्नामेंट जिंकल्यानंतर आरसीबीवर पैशांचा पाऊस पडला. आरसीबीला ६ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. त्याचवेळी दिल्लीला ३ कोटी रुपये मिळाले आहेत. (Ishant)

    शेअर करा