मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  पदक हुकलं पण पारूल चौधरी आणि रिले टीमनं मनं जिंकली, अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दाखवला दम

पदक हुकलं पण पारूल चौधरी आणि रिले टीमनं मनं जिंकली, अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दाखवला दम

Aug 28, 2023, 10:53 AMIST

World Athletics Championships : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेत नीरजने पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले आहे. गेल्या वेळी नीरज दुसऱ्या स्थानावर होता आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.

  • World Athletics Championships : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. या स्पर्धेत नीरजने पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले आहे. गेल्या वेळी नीरज दुसऱ्या स्थानावर होता आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरजने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ८८.१७ मीटरचा थ्रो केला. इतर कोणत्याही खेळाडूला हे अंतर पार करता आले नाही.
(1 / 5)
वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 मध्ये नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरजने त्याच्या दुसऱ्या प्रयत्नात ८८.१७ मीटरचा थ्रो केला. इतर कोणत्याही खेळाडूला हे अंतर पार करता आले नाही.(REUTERS)
अंतिम फेरीत ८८.१७ मीटर अंतर गाठण्याव्यतिरिक्त नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ८६.३२ मीटर, चौथ्या प्रयत्नात ८४.६४ मीटर, पाचव्या प्रयत्नात ८७.७३ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ८३.९८ मीटर अंतर पार केले.
(2 / 5)
अंतिम फेरीत ८८.१७ मीटर अंतर गाठण्याव्यतिरिक्त नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ८६.३२ मीटर, चौथ्या प्रयत्नात ८४.६४ मीटर, पाचव्या प्रयत्नात ८७.७३ मीटर आणि सहाव्या प्रयत्नात ८३.९८ मीटर अंतर पार केले.(AP)
नीरजनंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.८२ मीटर अंतर पार केले. अशा प्रकारे नदीमने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. फायनल संपल्यानंतर नीरजने नदीमचे मिठी मारून अभिनंदन केले.
(3 / 5)
नीरजनंतर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ८७.८२ मीटर अंतर पार केले. अशा प्रकारे नदीमने जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. फायनल संपल्यानंतर नीरजने नदीमचे मिठी मारून अभिनंदन केले.(AFP)
भारताच्या पारुल चौधरीने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ११ वे स्थान मिळविले. पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला. या रेकॉर्डसह ती २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तिने ही शर्यत ९ मिनिटे १५.३१ सेकंदात पूर्ण केली.
(4 / 5)
भारताच्या पारुल चौधरीने जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ११ वे स्थान मिळविले. पारुल चौधरीने ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये राष्ट्रीय विक्रम मोडला. या रेकॉर्डसह ती २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तिने ही शर्यत ९ मिनिटे १५.३१ सेकंदात पूर्ण केली.(AFP)
जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत भारताला पदक मिळवता आले नाही. टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर राहिली. भारतासाठी या शर्यतीत अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनास याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी भाग घेतला. टीम इंडियाने ही शर्यत २ मिनिटे ५९.९२ सेकंदात पूर्ण केली. 
(5 / 5)
जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुषांच्या 4x400 मीटर रिले शर्यतीत भारताला पदक मिळवता आले नाही. टीम इंडिया पाचव्या क्रमांकावर राहिली. भारतासाठी या शर्यतीत अमोज जेकब, राजेश रमेश, मोहम्मद अनास याहिया आणि मोहम्मद अजमल वरियाथोडी यांनी भाग घेतला. टीम इंडियाने ही शर्यत २ मिनिटे ५९.९२ सेकंदात पूर्ण केली. (SAI Media Twitter)

    शेअर करा