मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai western railway Block : पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai western railway Block : पश्चिम रेल्वे मेगा ब्लॉकच्या पहिल्याच दिवशी मुंबईकर प्रवाशांचे प्रचंड हाल

Oct 28, 2023, 01:04 PMIST

Mumbai Western Railway Mega Block: खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान ६ व्या लाइनचे काम सुरू आहे.

रेल्वेकडून खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान ६ व्या लाइनचे काम सुरु करण्यात आले आहे. यामुळे मुंबईत पश्चिम रेल्वेमार्गावर ११ दिवसांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.  परिणामी, अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.
(1 / 4)

दरम्यान, अप आणि डाऊन मार्गावरील २५६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. चाकरमान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बोरवली, अंधेरी, दादरसह अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
(2 / 4)

खार आणि गोरेगाव रेल्वे स्थानकांदरम्यान ६ व्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे पश्चिम रेल्वेने ११ दिवसांचा मेगाब्लॉक जाहीर केला.
(3 / 4)

२६ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर मुंबई लोकल ट्रेन सेवेवर देखील या ब्लॉकचा परिणाम होत आहे.
(4 / 4)
२६ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी विभागात मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. पश्चिम आणि हार्बर मार्गावर मुंबई लोकल ट्रेन सेवेवर देखील या ब्लॉकचा परिणाम होत आहे.(HT)

    शेअर करा