मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Virat Kohli: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल, विराट कितव्या क्रमांकावर?

Virat Kohli: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत ख्रिस गेल अव्वल, विराट कितव्या क्रमांकावर?

Apr 06, 2024, 11:42 PMIST

Most T20 Centuries: आयपीएल २०२४ च्या १९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक झळकावले. 

  • Most T20 Centuries: आयपीएल २०२४ च्या १९व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विराट कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध शतक झळकावले. 
टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. जयपूरयेथे राजस्थान रॉयल्सविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या विराटने ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मायकेल क्लिंगरला मागे टाकले. विराटने टी-२० कारकिर्दीतील नववे शतक पूर्ण केले आहे.
(1 / 5)

विराटने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ७२ चेंडूत नाबाद ११३ धावांची खेळी केली. त्याच्या डावात १२ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. स्ट्राईक रेट १५६.९४ . पण आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात संथ शतक आहे. त्याने ६७  चेंडूत शतक झळकावले. 
(2 / 5)

ख्रिस गेल सध्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या शतकांची संख्या २२ आहे. ४६३ सामन्यांत (४५५ डाव) त्याने २२ शतके आणि ८८ अर्धशतके झळकावली. टी-२० क्रिकेटमधील त्याची सर्वोच्च धावसंख्या नाबाद १७५ आहे.
(3 / 5)

 विराटच्या आधी पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू टी-२०मध्ये सर्वाधिक शतकांच्या यादीत आहे. त्याने २९० सामन्यात (२८०डाव) ११ शतके झळकावली. त्याची सरासरी ४४.२८ आहे. आणि स्ट्राईक रेट १२९.३२ आहे. आणि एकूण अर्धशतकांची संख्या ८७ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १२२ इतकी आहे.
(4 / 5)

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी-२० आणि आयपीएलमध्ये एकूण ३८१ सामने (३६४ डाव) खेळले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या एकूण शतकांची संख्या नऊ झाली आहे. त्याची नाबाद १२२ धावा सर्वोच्च धावसंख्या आहे.
(5 / 5)

    शेअर करा