मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  World Cup 2023: विश्वचषकातील टॉप १० सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, विराट कोहली पहिल्या स्थानावर

World Cup 2023: विश्वचषकातील टॉप १० सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, विराट कोहली पहिल्या स्थानावर

Oct 18, 2023, 11:25 PMIST

ICC Cricket World Cup 2023:  आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अव्वल १० क्षेत्ररक्षकांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा विराट कोहली अव्वल ठरला आहे.

  • ICC Cricket World Cup 2023:  आयसीसी म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अव्वल १० क्षेत्ररक्षकांची नावे जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा विराट कोहली अव्वल ठरला आहे.
यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. आयसीसीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने या स्पर्धेतील तीन सामन्यात तीन शानदार झेल पकडले आहेत. यामुळे विराट कोहलीला २२.३० रेटिंग गुण मिळाले आहेत.
(1 / 5)
यंदाच्या विश्वचषकात विराट कोहलीने सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. आयसीसीने उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानी आहे. विराट कोहलीने या स्पर्धेतील तीन सामन्यात तीन शानदार झेल पकडले आहेत. यामुळे विराट कोहलीला २२.३० रेटिंग गुण मिळाले आहेत.(AFP)
विराट कोहलीनंतर इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील 3 सामन्यांमध्ये रूटने ४ झेल घेतले आहेत. रूट २१.७३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
(2 / 5)
विराट कोहलीनंतर इंग्लंडचा जो रूट दुसऱ्या स्थानावर आहे. सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील 3 सामन्यांमध्ये रूटने ४ झेल घेतले आहेत. रूट २१.७३ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.(PTI)
सध्याच्या विश्वचषकात क्षेत्ररक्षणात डेव्हिड वॉर्नरने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्याने ३ सामन्यात एकूण ५ झेल घेतले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत डेव्हिड वॉर्नरला २१.३२ रेटिंग गुण मिळाले आहेत.
(3 / 5)
सध्याच्या विश्वचषकात क्षेत्ररक्षणात डेव्हिड वॉर्नरने संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करून दाखवली आहे. त्याने ३ सामन्यात एकूण ५ झेल घेतले आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या यादीत डेव्हिड वॉर्नरला २१.३२ रेटिंग गुण मिळाले आहेत.(PTI)
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉन्वेने सध्याच्या विश्वचषकात फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने ३ सामन्यात ४ झेल घेतले आहेत. आयसीसीच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीत कॉन्वे चौथ्या क्रमांकावर आहे. कॉनवेचा रेटिंग पॉइंट १५.५४ आहे.
(4 / 5)
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हन कॉन्वेने सध्याच्या विश्वचषकात फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याने ३ सामन्यात ४ झेल घेतले आहेत. आयसीसीच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीत कॉन्वे चौथ्या क्रमांकावर आहे. कॉनवेचा रेटिंग पॉइंट १५.५४ आहे.(AP)
सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीत विराटशिवाय भारताचा इशान किशन १०व्या स्थानावर आहे. त्याचे १३ रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानचा शादाब खान (१५.१३ गुण), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (१५ गुण), अफगाणिस्तानचा रहमत शाह (१३.७७ गुण), न्यूझीलंडचा मिचेल सँटनर (१३.२८ गुण) आणि पाकिस्तानचा फखर जमान (१३.०१) अनुक्रमे पाचव्या ते नवव्या स्थानावर आहेत.
(5 / 5)
सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांच्या यादीत विराटशिवाय भारताचा इशान किशन १०व्या स्थानावर आहे. त्याचे १३ रेटिंग गुण आहेत. पाकिस्तानचा शादाब खान (१५.१३ गुण), ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (१५ गुण), अफगाणिस्तानचा रहमत शाह (१३.७७ गुण), न्यूझीलंडचा मिचेल सँटनर (१३.२८ गुण) आणि पाकिस्तानचा फखर जमान (१३.०१) अनुक्रमे पाचव्या ते नवव्या स्थानावर आहेत.(AP)

    शेअर करा