मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vijaya Ekadashi : जाणून घ्या व्रताचे नियम, काय करावे व काय करू नये

Vijaya Ekadashi : जाणून घ्या व्रताचे नियम, काय करावे व काय करू नये

Mar 05, 2024, 11:54 PMIST

Vijaya ekadashi 2024 do or dont : उद्या विजया एकादशी आहे. विजया एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे पालन करावे, अशी धार्मिक मान्यता आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊया.

एकादशी तिथी भगवान विष्णूला प्रिय मानली जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. शिवाय त्यांच्यासाठी उपवासही केला जातो. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो, असे मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशी म्हणतात.
(1 / 11)

आता ६ व ७ मार्चला विजया स्मार्त एकादशी व भागवत एकादशी येत आहे. एकादशीच्या दिवशी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात अशी धार्मिक मान्यता आहे. अन्यथा भगवान विष्णू क्रोधित होतात आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. चला जाणून घेऊया विजया एकादशीला काय करावे आणि काय करू नये.
(2 / 11)

विजया एकादशीची प्रारंभ व समाप्ती वेळ: पंचांगानुसार, विजया एकादशी तिथी ६ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता सुरू होईल. ते दुसऱ्या दिवशी म्हणजे ७ मार्चला पहाटे ४:१३ वाजता संपेल. अशा स्थितीत ६ मार्च रोजी विजया स्मार्त एकादशीचे व ७ मार्चला भागवत एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
(3 / 11)

माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशी किंवा भागवत एकादशी म्हणून ओळखळी जाते. एकादशीची सुरुवात भगवान विष्णूच्या आराधनेने करावी.
(4 / 11)

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा प्रथेनुसार करावी. शेवटी, भगवान विष्णूला काहीतरी विशेष अर्पण करा.
(5 / 11)

एकादशी तिथीला दान-धर्म करण्यालाही फार महत्व आहे. तेव्हा एकादशी तिथीला आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे.
(6 / 11)

एकादशी तिथीला विष्णू मंत्राचा जप करा. भगवान विष्णूसोबत लक्ष्मी मातेचीही मनोभावे पूजा करा. उपवासासोबतच भजन-किर्तन करा.
(7 / 11)

एकादशीला तांदूळ खाऊ नये, कारण पौराणिक कथेनुसार महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ आणि बार्लीच्या रूपात जन्म घेतला असे म्हटले जाते. महर्षि मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. ज्या दिवशी महर्षींचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते, त्या दिवशी एकादशी होती. तेव्हापासून तांदूळ आणि बार्ली यांच्यात जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला भात खाऊ नये अशी मान्यता आहे.
(8 / 11)

उपवासाच्या दिवशी कोणताही वाद टाळावा. या दिवशी ज्येष्ठांचा आणि महिलांचा अपमान करू नये. तसेच कोणाबद्दल वाईट बोलू नये. या दिवशी कोणीही आरडाओरडा करू नये. रागावर नियंत्रण ठेवावे.
(9 / 11)

इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने एकादशी व्रत केले जाते असा शास्त्रात उल्लेख आहे. यामुळे एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नये. त्याच बरोबर दिवसा झोपू नये.
(10 / 11)
इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने एकादशी व्रत केले जाते असा शास्त्रात उल्लेख आहे. यामुळे एकादशीच्या दिवशी लसूण, कांदा, मांस, मासे, अंडी इत्यादी गोष्टी खाऊ नये. त्याच बरोबर दिवसा झोपू नये.( Free)
काळा रंग अशुभ मानला जातो, काळ्या रंगातून नकारात्मक शक्ती वातावरणात पसरते, यामुळे एकादशी तिथीला काळ्या रंगाचे कपडे घालू नये. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(11 / 11)

    शेअर करा