मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  UPA Meeting : देशातील २६ राजकीय पक्षांचे नेते बंगळुरुत; विरोधकांच्या बैठकीत काय घडतंय?

UPA Meeting : देशातील २६ राजकीय पक्षांचे नेते बंगळुरुत; विरोधकांच्या बैठकीत काय घडतंय?

Jul 18, 2023, 04:14 PMIST

Opposition Meet Bengaluru 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांची बंगळुरुत बैठक पार पडत आहे. त्यात देशातील अनेक मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली आहे.

Opposition Meet Bengaluru 2023 : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांची बंगळुरुत बैठक पार पडत आहे. त्यात देशातील अनेक मातब्बर नेत्यांनी हजेरी लावली आहे.
आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांचे नेत्यांची कर्नाटकातील बंगळुरुत महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.
(1 / 7)
आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्षांचे नेत्यांची कर्नाटकातील बंगळुरुत महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.(Shrikant Singh)
कॉंग्रेसच्या प्रमुख भूमिकेत विरोधी पक्षांची बैठक पार पडत आहे. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत सहभागी झाले.
(2 / 7)
कॉंग्रेसच्या प्रमुख भूमिकेत विरोधी पक्षांची बैठक पार पडत आहे. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत सहभागी झाले.(Shrikant Singh)
भाजपची देशातील १६ राज्यांमध्ये सत्ता नाहीये, त्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी विरोधी पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे.
(3 / 7)
भाजपची देशातील १६ राज्यांमध्ये सत्ता नाहीये, त्या राज्यांमध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी विरोधी पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे.(Shrikant Singh)
झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं विरोधकांच्या बैठकीत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्वागत केलं.
(4 / 7)
झारखंड मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं विरोधकांच्या बैठकीत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्वागत केलं.(HT)
जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या देखील विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरुत पोहचल्या आहे.
(5 / 7)
जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या देखील विरोधकांच्या बैठकीसाठी बंगळुरुत पोहचल्या आहे.(HT)
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे देखील बंगळुरुत दाखल झाले आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील प्रमुख नेते अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव आणि नीतीश यांची उपस्थिती कॉंग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
(6 / 7)
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे देखील बंगळुरुत दाखल झाले आहे. हिंदी भाषिक पट्ट्यातील प्रमुख नेते अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव आणि नीतीश यांची उपस्थिती कॉंग्रेससाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.(HT)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे देखील विरोधकांच्या बैठकीत सामील झाले आहे. दक्षिणेत भाजपविरोधी राजकारणाची धुरा विरोधी पक्षांकडून स्टॅलिन यांच्या हाती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
(7 / 7)
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन हे देखील विरोधकांच्या बैठकीत सामील झाले आहे. दक्षिणेत भाजपविरोधी राजकारणाची धुरा विरोधी पक्षांकडून स्टॅलिन यांच्या हाती देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.(Shrikant Singh)

    शेअर करा