मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Top 10 Rich Indian : भारतातील टॉप १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

Top 10 Rich Indian : भारतातील टॉप १० सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती

Oct 12, 2023, 09:45 PMIST

Top Richest Indian : १० ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘The Hurun India Rich List 2023’ मध्ये मुकेश अंबानी यांनी भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपतीचे स्थान पुन्हा पटकावले आहे. या यादीमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींना त्यांच्या निव्वळ संपत्तीच्या आधारे स्थान देण्यात आले आहे. 

Mukesh Ambani : भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पटकावले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल ८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी यांच्याकडे असलेल्या संपत्तीची निर्मिती प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग आणि तेल क्षेत्रातून मिळते. ते कंपनीतील सर्वात मोठे भागधारक आहे. 
(1 / 10)
Mukesh Ambani : भारतातील श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पटकावले आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाकडे तब्बल ८ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. अंबानी यांच्याकडे असलेल्या संपत्तीची निर्मिती प्रामुख्याने पेट्रोकेमिकल्स, रिफायनिंग आणि तेल क्षेत्रातून मिळते. ते कंपनीतील सर्वात मोठे भागधारक आहे. (PTI)
Gautam Adani : भारतात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतलं दुसरं नाव म्हणजे अदानी उद्योग समुहाचे संस्थापक गौतम अदानी. गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे तब्बल ४ लाख ७४ हजार कोटीची संपत्ती आहे. गेल्या वर्षी अदानी आणि कुटुंबीयांचा श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक होता. अदानी समूह हा ऊर्जानिर्मिती, कृषी व्यवसाय, रिअल इस्टेट, बंदरे आणि संरक्षण उपकरण निर्मिती यासह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. 
(2 / 10)
Gautam Adani : भारतात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतलं दुसरं नाव म्हणजे अदानी उद्योग समुहाचे संस्थापक गौतम अदानी. गौतम अदानी आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे तब्बल ४ लाख ७४ हजार कोटीची संपत्ती आहे. गेल्या वर्षी अदानी आणि कुटुंबीयांचा श्रीमंतांच्या यादीत पहिला क्रमांक होता. अदानी समूह हा ऊर्जानिर्मिती, कृषी व्यवसाय, रिअल इस्टेट, बंदरे आणि संरक्षण उपकरण निर्मिती यासह विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. (Image Credit : google/Wikimedia Commons )
Cyrus S Poonawalla : श्रीमंत भारतीय उद्योगपतींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर उद्योगपती सायरस पूनावाला यांचे नाव आहे. पूनावाला हे पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक असून जगातील सर्वात मोठे लस उत्पादक आहेत. आरोग्यसेवेतील त्यांच्या योगदानामुळे प्रचंड आर्थिक लाभांश मिळाला आहे.
(3 / 10)
Cyrus S Poonawalla : श्रीमंत भारतीय उद्योगपतींच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर उद्योगपती सायरस पूनावाला यांचे नाव आहे. पूनावाला हे पुणे स्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक असून जगातील सर्वात मोठे लस उत्पादक आहेत. आरोग्यसेवेतील त्यांच्या योगदानामुळे प्रचंड आर्थिक लाभांश मिळाला आहे.(Image Credit: google/Wikimedia Commons)
Shiv Nadar : एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक, उद्योगपती शिव नाडर हे भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या यांदीत चौथ्या क्रमांकावर आहेत. नाडर आणि कुटुंबाकडे २ लाख २८ हजार ९०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात त्यांच्या कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कंपनीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 
(4 / 10)
Shiv Nadar : एचसीएल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक, उद्योगपती शिव नाडर हे भारतातील श्रीमंत उद्योगपतींच्या यांदीत चौथ्या क्रमांकावर आहेत. नाडर आणि कुटुंबाकडे २ लाख २८ हजार ९०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. भारताच्या माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रात त्यांच्या कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कंपनीला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. (Image Credit: google/Wikimedia Commons )
Gopichand Hinduja : गोपीचंद हिंदुजा हे भारतात जन्मलेले ब्रिटीश अब्जाधीश उद्योगपती असून भारत आणि जगभरात कार्यरत हिंदुजा उद्योगसमूहाचे ते प्रमुख आहेत. हिंदुजा समूह प्रामुख्याने वाहन निर्मिती, रसायन निर्मिती, तेल शुद्धिकरण, बँक तसेच वित्त सेवांमध्ये कार्यरत आहे. गोपीचंद हिंदुजा आणि कुटुंबाकडे १ लाख ७६, ५०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
(5 / 10)

Dilip Shanghvi : सन फार्मास्युटिकल्सची स्थापना करणारे दिलीप सांघवी हे भारतातले अब्जाधीश उद्योगपती असून देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. सन ही भारतातली सर्वात मोठी औषध उत्पादन करणारी कंपनी असून जगातली पाचव्या क्रमांकाची कंपनी आहे. ताज्या Hurun List नुसार सांघवी यांच्याकडे १ लाख ६४, ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
(6 / 10)

Lakshmi Mittal : पोलाद निर्मिती आणि खान क्षेत्रातली जगातली आघाडीची कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि सीईओ लक्ष्मी मित्तल हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. मित्तल हे ब्रिटनमध्ये राहतात. मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे १ लाख ६२, ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
(7 / 10)
Lakshmi Mittal : पोलाद निर्मिती आणि खान क्षेत्रातली जगातली आघाडीची कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तलचे अध्यक्ष आणि सीईओ लक्ष्मी मित्तल हे श्रीमंत भारतीयांच्या यादीत सातव्या स्थानावर आहेत. मित्तल हे ब्रिटनमध्ये राहतात. मित्तल आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे १ लाख ६२, ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.(REUTERS)
Radhakishan Damani : राधाकिशन दमानी हे भारतीय अब्जाधीश गुंतवणूकदार, उद्योगपती आणि Avenue Supermarts Limited चे संस्थापक आहेत. दमानी यांनी डीमार्टची स्थापना केली होती. दमानी यांच्याकडे १ लाख ४३, ९०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
(8 / 10)

Kumar Mangalam Birla : श्रीमंत भारतीयांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत आदित्य बिर्ला उद्योगसमूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला. आदित्य बिर्ला समूह हा दूरसंचार, सिमेंट निर्मितीपासून रसायन उद्योग, टेक्स्टाइल, वित्त सेवा, दूरसंचार क्षेत्रात कार्यरत आहे. बिर्ला यांच्याकडे १ लाख २५, ६०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
(9 / 10)
Kumar Mangalam Birla : श्रीमंत भारतीयांच्या यादीत नवव्या क्रमांकावर आहेत आदित्य बिर्ला उद्योगसमूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला. आदित्य बिर्ला समूह हा दूरसंचार, सिमेंट निर्मितीपासून रसायन उद्योग, टेक्स्टाइल, वित्त सेवा, दूरसंचार क्षेत्रात कार्यरत आहे. बिर्ला यांच्याकडे १ लाख २५, ६०० कोटी रुपयांची मालमत्ता आहे.(Image Credit: google/Wikimedia Commons)
Niraj Bajaj : उद्योगपती नीरज बजाज हे मुकंद इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. ते बजाज ग्रूपच्या संचालक मंडळावर आहेत. मुकंद कंपनीतर्फे प्रामुख्याने लोखंडापासून विविध उत्पादनांची निर्मिती केली जाते. नीरज बजाज यांच्याकडे १ लाख २० हजार ७०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.
(10 / 10)

    शेअर करा