मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Income Tax Saving Schemes : आयकरात सूट मिळवण्यासाठी कोणत्या आहेत ‘या’ योजना ?

Income Tax Saving Schemes : आयकरात सूट मिळवण्यासाठी कोणत्या आहेत ‘या’ योजना ?

Dec 09, 2022, 03:13 PMIST

2022-23 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची वेळ जवळ येत आहे. त्याआधी, करदाते आयकर सवलत मिळविण्याचे मार्ग शोधत आहेत. या परिस्थितीत आयकर सवलत असलेल्या या सरकारी योजनांचे तपशील जाणून घ्या.

  • 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न भरण्याची वेळ जवळ येत आहे. त्याआधी, करदाते आयकर सवलत मिळविण्याचे मार्ग शोधत आहेत. या परिस्थितीत आयकर सवलत असलेल्या या सरकारी योजनांचे तपशील जाणून घ्या.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये गुंतवणूक केल्यास आयकर सवलत मिळते. आयकर कायद्याचे कलम 80C PPF वर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलत देते. विविध सरकारी बँकांव्यतिरिक्त, पीपीएफ खाती खाजगी बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये थाते उघडता येते. सध्या पीपीएफमध्ये ७.१ टक्के व्याजदर आहे.
(1 / 4)

राष्ट्रीय पेन्शन योजनेत गुंतवणूक केल्यास आयकर सवलत मिळते. आयकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत, एनपीएसमध्ये जास्तीत जास्त दीड लाख रुपयांपर्यंतची कर कपात उपलब्ध आहे. तसेच, कलम ८० सीसीडीअंतर्गत, एनपीएसमध्ये गुंतवणुकीसाठी ५० हजार रुपयांची अतिरिक्त कर वजावट उपलब्ध आहे.
(2 / 4)

ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमधील गुंतवणूक आयकर सवलतीसाठी पात्र आहेत. ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. या योजनेसाठी पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाती उघडता येतात. या खात्यातील ठेवी आयकर कायद्याच्या कलम ८० सीअंतर्गत करमुक्त आहेत. या योजनेत गुंतवणूक केल्यास वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंतची करसवलत मिळते. सध्या या योजनेचा व्याजदर ७.४ टक्के आहे.
(3 / 4)

दरम्यान, मुलांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज, गृहकर्जावरील आयकर सूट यांचा दावा केला जाऊ शकतो. आयकर कायद्याच्या कलम २४ बी अंतर्गत, करदात्याला २ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सूट मिळू शकते. दरम्यान, घरभाड्यावर आयकर सूट मिळू शकते. तसेच आरोग्य विमा प्रीमियमवर कलम ८० डी अंतर्गत २५ हजार टक्‍क्‍यांपर्यंत कर वजावट मिळते.
(4 / 4)

    शेअर करा