मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rishabh Pant: ऋषभ पंत, अक्षर पटेल तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, पाहा फोटो

Rishabh Pant: ऋषभ पंत, अक्षर पटेल तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, पाहा फोटो

Nov 03, 2023, 03:13 PMIST

Rishabh Pant And Axar Patel: भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल तिरुपतीच्या दर्शनाला गेले आहेत.

Rishabh Pant And Axar Patel: भारताचा विकेटकिपर ऋषभ पंत आणि ऑलराऊंडर अक्षर पटेल तिरुपतीच्या दर्शनाला गेले आहेत.
कार अपघातातील गंभीर दुखापतीतून सावरणारा भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने आज तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. ऋषभ पंतसोबतच भारताचा ऑलराऊंडर अक्षर पटेल यानेही तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.
(1 / 5)
कार अपघातातील गंभीर दुखापतीतून सावरणारा भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने आज तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. ऋषभ पंतसोबतच भारताचा ऑलराऊंडर अक्षर पटेल यानेही तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले.
ऋषभ पंत २०२२ मध्ये रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. तो अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, आता तो दुखापतीतून सावरला असून आगामी काळात क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.
(2 / 5)
ऋषभ पंत २०२२ मध्ये रस्ता अपघातात गंभीर जखमी झाला होता. तो अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मात्र, आता तो दुखापतीतून सावरला असून आगामी काळात क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची तयारी करत आहे.(PTI)
विश्वचषकासाठी निवड झालेल्या अक्षर पटेलने दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी संघातून माघार घेतली. अक्षराची जागा आर अश्विनने घेतली आहे. ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यावर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू आहेत.
(3 / 5)
विश्वचषकासाठी निवड झालेल्या अक्षर पटेलने दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी संघातून माघार घेतली. अक्षराची जागा आर अश्विनने घेतली आहे. ऋषभ पंत आणि अक्षर पटेल यांच्यावर सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू आहेत.(AP)
अक्षर पटेलने भारतासाठी १२ कसोटी, ५४ एकदिवसीय आणि ४५ टी-२० खेळले आहेत. कसोटीत त्याने ५० विकेट घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५९ विकेट आहेत. याशिवाय, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३९ विकेट घेतल्या आहेत. 
(4 / 5)
अक्षर पटेलने भारतासाठी १२ कसोटी, ५४ एकदिवसीय आणि ४५ टी-२० खेळले आहेत. कसोटीत त्याने ५० विकेट घेतल्या आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ५९ विकेट आहेत. याशिवाय, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३९ विकेट घेतल्या आहेत. (AP)
ऋषभ पंतने भारतासाठी ३३ कसोटी सामन्यांमध्ये २ हजार २७१ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ अर्धशतक आणि ५ शतकांचा समावेश आहे. ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ८६५ धावा केल्या. यामध्ये एक शतक, आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने ६६ टी-२० सामन्यात ९८७ धावा केल्या आहेत, ज्यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
(5 / 5)

    शेअर करा