मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sunil Chhetri Records : भारतीय फुटबॉलचा कोहिनूर सुनील छेत्रीचे हे रेकॉर्ड माहीत आहेत का? जाणून घ्या

Sunil Chhetri Records : भारतीय फुटबॉलचा कोहिनूर सुनील छेत्रीचे हे रेकॉर्ड माहीत आहेत का? जाणून घ्या

Aug 03, 2023, 01:52 PMIST

sunil chhetri birthday : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आज (३ ऑगस्ट) ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. छेत्री हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा आणि गोल करणारा फुटबॉलपटू आहे. सुनील छेत्रीच्या नावावर कोणकोणते विक्रम आहेत, ते जाणून घ्या.

  • sunil chhetri birthday : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आज (३ ऑगस्ट) ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. छेत्री हा भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा आणि गोल करणारा फुटबॉलपटू आहे. सुनील छेत्रीच्या नावावर कोणकोणते विक्रम आहेत, ते जाणून घ्या.
फुटबॉलमध्ये अनेक मोठे विक्रम नोंदवणाऱ्या छेत्रीने २००५ साली पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने या खेळात भारताचा झेंडा जगभर फडकवला. सुनील छेत्रीचे उत्कृष्ट रेकॉर्ड फुटबॉल खेळाप्रती त्याचे समर्पण आणि कठोर परिश्रम दर्शवतात.
(1 / 7)

भारताकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सुनील छेत्रीच्या नावावर आहे. छेत्रीने आतापर्यंत १४२ सामने खेळले आहेत.
(2 / 7)
भारताकडून आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सुनील छेत्रीच्या नावावर आहे. छेत्रीने आतापर्यंत १४२ सामने खेळले आहेत.(photos- Sunil Chhetri Instagram)
सुनील छेत्री भारतासाठी सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील एकूण सामन्यांमध्ये त्याने ९२  गोल केले आहेत.
(3 / 7)

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सुनील छेत्री चौथ्या क्रमांकावर आहे. सक्रिय खेळाडू म्हणून तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे रोनाल्डो आणि मेस्सी आहेत.
(4 / 7)

सुनील छेत्रीला विक्रमी ७ वेळा AIFF प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार मिळाला आहे. छेत्रीला हा पुरस्कार २००७, २०११, २०१३, २०१४, २०१७, २०१८-१९ आणि २०२१-२२ मध्ये मिळाला.
(5 / 7)

सुनील छेत्री आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप या तीन वेगवेगळ्या खंडांमध्ये खेळला आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे.
(6 / 7)

सुनील छेत्री हा भारतासाठी सर्वाधिक तीनवेळा गोलची हॅटट्रिक करणारा खेळाडू आहे. ताजिकिस्तान, व्हिएतनाम आणि चायनीज तैपेईविरुद्ध त्याने हॅट्ट्रिक केली आहे. 
(7 / 7)

    शेअर करा