मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  लग्नासाठी भेटवस्तू म्हणून पुष्पगुच्छ देताय? ज्योतिषशास्त्र काय सांगते नक्की पाहा

लग्नासाठी भेटवस्तू म्हणून पुष्पगुच्छ देताय? ज्योतिषशास्त्र काय सांगते नक्की पाहा

Jan 25, 2024, 03:54 PMIST

Tips About Marriage Gift : लग्नाला जाताना भेट म्हणून फुलांचा गुच्छ घेऊन जाण्याची सवय आपल्या सर्वांना असते. परंतु सर्व प्रकारची फुले योग्य नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार लग्नासाठी हीच काही फुले भेट द्यावीत, तर पाहा ती फुले कोणती आहेत.

लग्नाला जाताना रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा भेटवस्तू घेणे अधिक योग्य ठरेल, असे वाटणे स्वाभाविक आहे. नवजोडप्यांना एखादी साधी आणि स्वस्त भेटवस्तू देण्याचा विचार केला की फुलांचा गुच्छ लक्षात येतो.सुंदर व बहरलेली फुले वधूंना नक्कीच आनंदित करतात. पण लग्नाची भेट म्हणून पुष्पगुच्छ देत असाल तर वास्तुशास्त्रात काही नियम आहेत. हे नियम जाणून घ्या.
(1 / 6)

गुलाबाचा पुष्पगुच्छ : गुलाब हे प्रेमाचे प्रतीक आहे. हे प्रेमाशी निगडीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या फुलाचा संबंध भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीशी आहे. हे फूल एखाद्याला भेट दिल्याने नाते घट्ट होते. विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र किंवा मंगळ कमजोर असेल तर अशा जोडप्यांना फक्त गुलाबाचे फूल भेट द्यावे.
(2 / 6)

रॅननक्युलस किंवा बटरकप: बटरकपची फुले लग्नाची भेट म्हणून अतिशय आकर्षक आणि लक्षवेधी असतात. मिथुन राशीचा वर किंवा वधू असेल तर त्यांना फक्त पांढरी बटरकप फुले द्यावीत. हे फूल शांततेचे प्रतीक मानले जाते. यामुळे माणसाच्या मानसिक समस्या दूर होतात. तसेच ते शुभ फलदायक ठरते.
(3 / 6)

लिलीचा पुष्पगुच्छ: पांढऱ्या आणि केशरी लिलीच्या फुलांचा पुष्पगुच्छ नवविवाहित जोडप्याला भेट म्हणून दिला जाऊ शकतो. हे चंद्रदोषापासून मुक्त होण्यास उपयुक्त आहे. ज्यांच्या कुंडलीत सूर्य दोष आहे त्यांना केशरी रंगाची फुले द्यावी. यामुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
(4 / 6)

सूर्यफुलांचा पुष्पगुच्छ: सूर्यफूल सकारात्मक ऊर्जा आणि तेजाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. त्यांना भेटवस्तू म्हणून दिल्यास कोणताही ग्रह दोष दूर होईल. यामुळे आदरही वाढतो.
(5 / 6)

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
(6 / 6)

    शेअर करा