मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sourav Ganguly : लॉर्ड्सवर जर्सी फिरवणे ते भारतात डे नाईट टेस्टचे आयोजन, गांगुलीचे डेअरिंगबाज निर्णय!

Sourav Ganguly : लॉर्ड्सवर जर्सी फिरवणे ते भारतात डे नाईट टेस्टचे आयोजन, गांगुलीचे डेअरिंगबाज निर्णय!

Jul 08, 2023, 08:43 PMIST

Sourav Ganguly Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हा क्रिकेट जगतात 'ऑफसाइडचा देव' मानला जातो. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. गांगुली आज त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Sourav Ganguly Birthday : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हा क्रिकेट जगतात 'ऑफसाइडचा देव' मानला जातो. सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. गांगुली आज त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे.
पहिली कसोटी लॉर्ड्सवर खेळलीदादाच्या दोन दशकांच्या कारकिर्दीतील अनेक अद्भुत क्षण आहेत. गांगुली त्याच्या अद्वितीय नेतृत्वासाठी ओळखला जातो. दादाने त्याच्या कारकिर्दीतील पहिला कसोटी सामना २० जून १९९६ रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध खेळला, ज्यामध्ये त्याने शतक झळकावून प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले.
(1 / 9)

भारतात डे नाईट टेस्ट  आणण्यात महत्त्वाची भूमिका-भारतात दिवस-रात्र कसोटी क्रिकेट आणण्यात गांगुलीचा मोलाचा वाटा आहे. गांगुलीच्या प्रयत्नांमुळेच भारताने २०१९ मध्ये ईडन गार्डन्सवर बांगलादेशविरुद्ध पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. २३ ऑक्टोबर २०१९ रोजी सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) ३९ वे अध्यक्ष बनला. तर त्याने २०२२ मध्ये राजीनामा दिला.
(2 / 9)

गांगुलीचे भारतीय क्रिकेटमधील योगदान-कर्णधार म्हणून गांगुलीने २००० मधील आयसीसी नॉकआउट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले. यानंतर टीम इंडियाने गांगुलीच्या नेतृत्वाखाली बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाचा २-१ असा शानदार पराभव केला.
(3 / 9)

लॉर्ड्सवर जर्सी फिरवलीगांगुलीने लॉर्ड्सच्या बाल्कनीत अँड्र्यू फ्लिंटॉफला चिडवण्यासाठी जर्सी हवेत फिरवून विजय साजरा केला, हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण ठरला. मात्र, नंतर गांगुलीला याचा खूप पश्चाताप झाला आणि त्याने पुन्हा याची पुनरावृत्ती करायला आवडणार नाही असे सांगितले.
(4 / 9)

गांगुलीचे करिअरगांगुलीने शेवटचा वनडे १५ नोव्हेंबर २००७ रोजी ग्वाल्हेर येथे खेळला. त्याने शेवटची कसोटी ६ नोव्हेंबर २००८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपूर येथे खेळली. यानंतर काही वर्षे तो इंडियन प्रीमियर लीग (ipl) मध्ये खेळत राहिला, गांगुलीने मे २०१२ मध्ये देशांतर्गत क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली.
(5 / 9)

गांगुलीने १९९२ मध्ये बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड सीरिजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने १९९६ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पणात शतक झळकावले. 
(6 / 9)

गांगुली हा जगातील महान फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने ११३ कसोटीत १६ शतकांसह ७२१२ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये, गांगुलीने ३११ सामने खेळले आणि २२ शतकांसह ११ हजार ३६३ धावा केल्या. सचिन तेंडुलकरसोबत त्याने सलामीला येत ८२२७ धावा जोडल्या.
(7 / 9)

गांगुलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ११३ कसोटी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले. गांगुलीने ३११ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०० विकेट्स घेतले आहेत. याशिवाय, कर्णधार म्हणून, गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये १९५ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि ९७ सामने जिंकले.
(8 / 9)

Sourav Ganguly Birthday
(9 / 9)
Sourav Ganguly Birthday(photos- Sourav Ganguly instagram)

    शेअर करा