मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर जोरदार टीका; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

Apr 11, 2024, 11:52 AMIST

memes on Raj Thackeray : सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला पाठिंबा देण्याची भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. सोशल मीडियावर मीम्स शेअर करून नेटकऱ्यांनी मनसे व राज यांना धारेवर धरलं आहे. पाहूया काय म्हणतात नेटकरी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मनसे महायुतीला पाठिंबा देत आहे, असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं. मात्र, मोदींना पाठिंबा का हे सांगताना त्यांच्या बोलण्यात अनेक विरोधाभास दिसून आले. एकीकडे लाखो उद्योजक बाहेर गेल्याचं राज यांनी सांगितलं. दुसरीकडं त्यांनी महाराष्ट्रातून कररूपानं जाणारा पैसा महाराष्ट्रात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रत्यक्षात महाविकास आघाडी सरकारच्या काळात जीएसटीच्या पैशासाठी झगडावं लागत होतं. याबद्दल ते काहीच बोलले नाहीत. त्यामुळं राज ठाकरे नेमकं काय बोलत अशी अवस्था अनेकांची झाली होती. त्याचं प्रतिबिंब सोशल मीडियात उमटलं आहे.
(1 / 8)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अलीकडंच दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. तेव्हापासून राज ठाकरे हे भाजपला अनुकूल निर्णय घेतील अशी चर्चा होती. ईडीचा ससेमिरा हे त्यामागील एक कारण सांगितलं जात होतं. त्याकडंही सोशल मीडियातून लक्ष वेधलं जात आहे.
(2 / 8)

पक्षाच्या स्थापनेपासूनच मनसेच्या भूमिका बदलत गेल्या आहेत. मनसे स्थापन झाली तेव्हा राज यांची भूमिका सर्वसमावेशक होती. त्यानंतर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली, कालांतरानं ते हिंदुत्वाकडं वळले. निवडणुकीच्या राजकारणातही कधी नरेंद्र मोदींना पाठिंबा, नंतर विरोध आणि आता पुन्हा समर्थन अशा भूमिका घेतल्या आहेत. त्यावर सोशल मीडियात भाष्य करण्यात आलंय.
(3 / 8)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेवर सोशल मीडियात टीका होत आहे. राज ठाकरे यांनी मोदींचं कौतुक केलं होतं. त्यांच्या पंतप्रधानपदाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांच्यावर टोकाची टीका केली होती. मोदींच्या आश्वासनांचे व्हिडिओ भर सभांमधून लावले होते. आता पुन्हा बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
(4 / 8)

चित्रपटातील दृश्यांचा आधार घेऊनही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकांवर काही नेटकऱ्यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांचं टायमिंग चुकत असल्याचं यातून दाखवण्यात आलं आहे.
(5 / 8)

२००९, २०२४, २०१९ आणि २०२२ अशा ठराविक कालावधीनंतर राज ठाकरे यांनी बदललेल्या भूमिकांचा लेखाजोखाच सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मांडला आहे.
(6 / 8)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या टोकाच्या भूमिकांवरही नेटकऱ्यांनी बोट ठेवलं आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका आणि नंतर बिनशर्त पाठिंबा या दोन्ही टोकाच्या भूमिका कशा आहेत हे मीम्सच्या माध्यमातून दाखवण्यात आलं आहे.
(7 / 8)

लाव रे तो व्हिडिओ… म्हणत राज ठाकरे यांनी २०१९ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांचे वाभाडे काढले होते. मात्र त्यांनी आता घूमजाव केल्यानंतर 'बंद कर तो व्हिडिओ' अशी टॅगलाइन लोक चालवत आहेत.
(8 / 8)

    शेअर करा