मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shreyas Talpade: '१० मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...'; बॉबी देओलने सांगितलं श्रेयससोबत काय घडलं!

Shreyas Talpade: '१० मिनिटांसाठी त्याच्या हृदयाची धडधड थांबली अन्...'; बॉबी देओलने सांगितलं श्रेयससोबत काय घडलं!

Dec 15, 2023, 04:12 PMIST

Shreyas Talpade Health Update: श्रेयसच्या तब्येतीची माहिती कळताच अभिनेता बॉबी देओल याने श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदे हिला फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी केली.

आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अभिनेत्याला आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला होता. 
(1 / 5)
आपल्या दमदार अभिनयाने केवळ मराठीच नव्हे तर, हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर नुकतीच अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अभिनेत्याला आगामी चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना हृदयविकाराचा झटका आला होता. (All Photos: @shreyastalpade27/IG)
श्रेयसच्या तब्येतीची माहिती कळताच अभिनेता बॉबी देओल याने श्रेयसची पत्नी दीप्ती तळपदे हिला फोन करून त्याच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी दिप्तीने त्याला श्रेयसची हेल्थ अपडेट दिली. 
(2 / 5)

'वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या शूटिंगवरून घरी परतल्यावर श्रेयसला अस्वस्थ वाटत होते. आणि हे पत्नीला सांगत असतानाच तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेव्हा १० मिनिटांसाठी त्याचे हृदय बंद पडले होते, अशी माहिती त्याची पत्नी दीप्ती हिने दिली. 
(3 / 5)

बॉबी म्हणाला की, श्रेयसचे हृदय १० मिनिटांसाठी बंद पडले होते हे ऐकून दीप्ती खूपच घाबरून गेली होती. मात्र, आता श्रेयसवर अँजिओप्लास्टी झाली असून, त्याची तब्येत सुधारत आहे, अशी माहिती तिने दिली आहे. 
(4 / 5)

यासोबतच दीप्ती तळपदे हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी सगळ्यांचे आभार मानले आहेत. तर, श्रेयस आता बरा होत असल्याचे देखील तिने सांगितले आहे. 
(5 / 5)

    शेअर करा