मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shoaib Akhtar : आसिफला बॅटने मारहाण ते ड्रग्जमुळे २ वर्षांची शिक्षा, शोएब अख्तरचे हे किस्से माहीत आहेत का?

Shoaib Akhtar : आसिफला बॅटने मारहाण ते ड्रग्जमुळे २ वर्षांची शिक्षा, शोएब अख्तरचे हे किस्से माहीत आहेत का?

Aug 13, 2023, 06:38 PMIST

shoaib akhtar birthday : शोएब अख्तर निःसंशयपणे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याने आपली कारकिर्द प्रचंड गाजवली. रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध शोएब अख्तर आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.

  • shoaib akhtar birthday : शोएब अख्तर निःसंशयपणे जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक होता. त्याने आपली कारकिर्द प्रचंड गाजवली. रावळपिंडी एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध शोएब अख्तर आज त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने त्याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
शोएब अख्तरने आपल्या कारकिर्दीत अनेक फलंदाजांना त्रास दिला. शोएब अख्तरचा जन्म १३ ऑगस्ट १९७५ रोजी रावळपिंडी येथे झाला. शोएब अख्तर आज ४८ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. या पाकिस्तानी बॉलरने आपल्या कारकिर्दीत प्रचंड दहशत निर्माण केली होती. 
(1 / 8)

आजही वेगवान गोलंदाजीचा विचार केला तर शोएब अख्तरचे नाव सर्वात आधी समोर येते. आजपर्यंत कोणताही गोलंदाज शोएब अख्तरचा सर्वात वेगवान चेंडूचा विक्रम मोडू शकला नाही. २००३ मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध १६१.३ KMPH चा चेंडू टाकला होता.
(2 / 8)

शोएब अख्तरने त्याच्या आत्मचरित्रात सचिन तेंडुलकर आपल्याला घाबरत असल्याचं म्हटलं आहे. त्याने लिहिले की, फैसलाबादच्या संथ खेळपट्टीवरही सचिन तेंडुलकर माझ्या वेगाला घाबरत होता. मात्र, यानंतर सचिनच्या चाहत्यांनी त्याला खूप ट्रोल केले.
(3 / 8)

शोएब अख्तर मैदानवर खूप आक्रमक होता. मैदानावर अनेकदा त्याचा संयम सुटलेला चाहत्यांनी पाहिले आहे. शोएबने २०११ साली ड्रेसिंग रूममध्ये त्याचाच सहकारी गोलंदाज मोहम्मद आसिफसोबत भांडण केले होते, त्यावेळी शोएबने आसिफला बॅटने मारहाण केली होती.
(4 / 8)

शोएब अख्तरवर ड्रग्ज घेतल्याने बंदीही घालण्यात आली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २००६ मध्ये शोएब अख्तर नॅंड्रोलोन चाचणीत पॉझिटिव्ह आढळला होता. हे आयसीसीने बंदी घातलेले औषध आहे. यानंतर आयसीसीने कठोर कारवाई करत अख्तरवर २ वर्षांची बंदी घातली होती.
(5 / 8)

२००२ मध्ये बांगलादेश दौऱ्यात शोएब अख्तरला प्रेक्षकांत बसलेल्या काही लोकांनी वीट मारली होती. यामुळे अख्तर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला मालिकेतून बाहेर व्हावे लागले. 
(6 / 8)

यानंतर पुढच्या वर्षी शोएबने झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर असताना प्रेक्षकांमध्ये बाटली फेकली होती. यामुळे त्याच्यावर काही दिवस बंदी घालण्यात आली होती.
(7 / 8)

shoaib akhtar controversies 
(8 / 8)
shoaib akhtar controversies (photos- shoaib akhtar instgram)

    शेअर करा