मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  sensex record : सेन्सेक्स ७१ हजार पार, गुंतवणूकदारांचा किती झाला फायदा? पाहा

sensex record : सेन्सेक्स ७१ हजार पार, गुंतवणूकदारांचा किती झाला फायदा? पाहा

Dec 15, 2023, 07:06 PMIST

Share market new record : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून तेजीची लाट आली आहे. या लाटेवर स्वार होत सेन्सेक्स आणि निफ्टी नवनवे उच्चांक गाठत आहेत. आज सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ७१ हजारांचा टप्पा ओलांडला. सेन्सेक्सच्या या भरारीमुळं गुंतवणूकदारांना छप्परफाड नफा झाला.

आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आज, शुक्रवारी बाजार उघडताच सेन्सेक्स ५६९.८८ अंकांनी उसळला आणि थेट ७१,०८४.०८ अंकांवर पोहोचला. त्यानंतर दिवसभर ही तेजी कायम होती. याचा मोठा फायदा गुंतवणूकदारांना झाला.(फोटो : पीटीआय)
(1 / 5)

काल, १४ डिसेंबर रोजी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ७०,५१४.२ अंकावर होता. शुक्रवारी बाजार उघडतात तो वधारत गेला आणि दिवसअखेर ९६९.५५ अंकांनी वधारून तो ७१,४८३.७५ वर स्थिरावला. (फोटो - रॉयटर्स)
(2 / 5)

सेन्सेक्समधील तेजीमुळं बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचं बाजारमूल्य ३५७ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. हा आजवरचा उच्चांक आहे. सेन्सेक्समधील आजच्या तेजीमुळं गुंतवणूकदारांना २ लाख कोटी रुपयांचा फायदा झाल्याचं समजतं (फोटो - अंशुमन पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स)
(3 / 5)

या शेअर्समध्ये झाली वाढ? टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (४.५१ टक्के), एचसीएल टेक (४.४२ टक्के), इन्फोसिस (४.०७ टक्के), टेक महिंद्रा (३.७२ टक्के), विप्रो (३.०४ टक्के), टाटा स्टील (१.८९ टक्के), जेएसडब्ल्यू स्टील (१.४५ टक्के) आणि टाटा मोटर्स (०.९२ टक्के) या कंपन्यांचे शेअर्स वधारले. (फोटो - अंशुमन पोयरेकर/हिंदुस्थान टाइम्स)
(4 / 5)

या कंपन्यांना बसला फटका? बीएसईच्या आकडेवारीनुसार, नेसले इंडिया (१.७५ टक्के), भारती एअरटेल (१.३० टक्के), आयटीसी (०.४० टक्के), अ‍ॅक्सिस बँक (०.०२ टक्के), मारुती (०.६५ टक्के), कोटक महिंद्रा (०.१८ टक्के) हे समभाग घसरले. (फोटो - पीटीआय)
(5 / 5)

    शेअर करा