मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Putrada ekadashi: या शुभ योगात पुत्रदा एकादशी, हे उपाय केल्याने होईल विष्णू-लक्ष्मी कृपा

Putrada ekadashi: या शुभ योगात पुत्रदा एकादशी, हे उपाय केल्याने होईल विष्णू-लक्ष्मी कृपा

Jan 17, 2024, 04:37 PMIST

Putrada Ekadashi 2024 Auspicious Yog And Upay : पौष पुत्रदा एकादशी यावेळी खूप खास आहे, या दिवशी ५ अद्भुत योग जुळून येत आहेत. या दिवशी हे उपाय केल्यास भगवान विष्णू व देवी लक्ष्मी यांची भक्तावर कृपा राहील.

पौष पुत्रदा एकादशी २१ जानेवारी २०२४ रविवार रोजी आहे. यावेळी पुत्रदा एकादशी अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे, ज्यामुळे सुख समृद्धी लाभेल. या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर लक्ष्मी आणि नारायण यांची कृपा प्राप्त होईल. एकादशी हे व्रत असे आहे जे पापमुक्त करते.
(1 / 7)

एकादशीच्या व्रताने सर्व संकट दूर होतात, श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष दूर होतात आणि मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते. संततीच्या सुखासाठी पौष पुत्रदा एकादशीचा उपवास विशेष मानला जातो. अशा परिस्थितीत, या दिवशी घडणारा दुर्मिळ योगायोग उपवासाचे दुप्पट परिणाम देईल. 
(2 / 7)

पौष पुत्रदा एकादशीला शुभ योग: पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी, अमृत सिद्धी, ब्रह्म योग, शुक्ल योग आणि त्रिग्रही योग यांचा संयोग होत असून, हे ५ दुर्मिळ योग तयार होत आहेत.
(3 / 7)

त्रिग्रही योग- या दिवशी बुध, मंगळ आणि शुक्र धनु राशीमध्ये असतील, त्यामुळे त्रिग्रही योग तयार होईल, या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल असे सांगितले जाते.
(4 / 7)

पौष पुत्रदा एकादशीसाठी उपाय : पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी श्री संतान गोपाल मंत्र - “ॐ देवकी सुत गोविंद वासुदेव जगत्पते.देहिमे तनयं कृष्ण त्वामहं शरणंगत:।।” या मंत्राचा ५ वेळा तुळशीच्या माळेने जप करावा. हा उपाय बाळंतपणासाठी फायदेशीर ठरतो, अशी मान्यता आहे.
(5 / 7)

पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णु सहस्रनामाचे पठण केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कुटुंबात आनंदाचे वातावरण नांदते.
(6 / 7)

भगवान विष्णूला पिवळी मिठाई व पिवळी फुले प्रिय आहे. या दिवशी पिवळ्या फुलांचा हार देवाला अर्पण करावा. श्री हरींच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावावा, तसेच स्वत:च्या कपाळाला पण टिळा लावावा, असे केल्याने विशेष फल प्राप्त होते. यामुळे तणाव कमी होतो.
(7 / 7)

    शेअर करा