मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PM Modi Tamil Nadu : पीएम मोदी भगवान विष्णूच्या चरणी, तामिळनाडूतील रंगनाथस्वामी मंदिरात केली पूजा

PM Modi Tamil Nadu : पीएम मोदी भगवान विष्णूच्या चरणी, तामिळनाडूतील रंगनाथस्वामी मंदिरात केली पूजा

Jan 20, 2024, 07:10 PMIST

PM Modi Tamil Nadu Visit : अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पीए मोदी सकाळी ११ वाजता तिरुचिरापल्लीच्या प्रसिद्ध श्री रंगनाथस्वामी मंदिरात पोहोचले. पंतप्रधान मोदींनी येथे प्रार्थना केली आणि हत्तींना फळं खाऊ घातली.

  • PM Modi Tamil Nadu Visit : अयोध्येत रामाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तामिळनाडूच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पीए मोदी सकाळी ११ वाजता तिरुचिरापल्लीच्या प्रसिद्ध श्री रंगनाथस्वामी मंदिरात पोहोचले. पंतप्रधान मोदींनी येथे प्रार्थना केली आणि हत्तींना फळं खाऊ घातली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (२० जानेवारी) तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील प्रसिद्ध श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. 
(1 / 7)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी (२० जानेवारी) तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील प्रसिद्ध श्री रंगनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. (ANI)
श्री रंगनाथस्वामी मंदिर हे भगवान विष्णूच्या पूजेसाठी सर्वात महत्वाचे मंदिर मानले जाते. या मंदिरात पूजा करण्यासाठी पंतप्रधान मोदी पारंपरिक पोशाख परिधान करून आले होते. पूजेनंतर पंतप्रधानांनी हत्तीला फळं खाऊ घातली.
(2 / 7)

मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरदेखील पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घातला होता. यानंतर ते आता येथील मंदिरात हत्तीला चारा खाऊ घालताना दिसले. एवढेच नाही तर मोदींनी गजराजांचे आशीर्वादही घेतले. 
(3 / 7)
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरदेखील पीएम मोदींनी गायींना चारा खाऊ घातला होता. यानंतर ते आता येथील मंदिरात हत्तीला चारा खाऊ घालताना दिसले. एवढेच नाही तर मोदींनी गजराजांचे आशीर्वादही घेतले. (ANI)
पीएम मोदींना आशीर्वाद देणाऱ्या या हत्तीचे नाव 'आंदल' आहे. त्यांनी पंतप्रधानांसाठी माऊथ ऑर्गनही वाजवले.  तत्पूर्वी या मंदिर परिसरात पंतप्रधानांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. पीएम मोदींनी आपल्या वाहनातून हात दाखवत गर्दीला अभिवादन केले.
(4 / 7)

 श्रीरंगम मंदिर हे श्री रंगनाथन यांना समर्पित हिंदू मंदिर आहे. श्रीरंगम मंदिर हे भारतातील सर्वात मोठे मंदिर संकुल आणि जगातील सर्वात मोठे धार्मिक संकुल आहे.
(5 / 7)
 श्रीरंगम मंदिर हे श्री रंगनाथन यांना समर्पित हिंदू मंदिर आहे. श्रीरंगम मंदिर हे भारतातील सर्वात मोठे मंदिर संकुल आणि जगातील सर्वात मोठे धार्मिक संकुल आहे.
रंगनाथस्वामी मंदिर हे विजयनगर काळात (१३३६-१५६५) बांधले गेले असावे, असे मानले जाते. मंदिरातील देवतेचे निवासस्थान अनेकदा नाम पेरुमल आणि अढागिया मानवलन म्हणून ओळखले जाते. 
(6 / 7)
रंगनाथस्वामी मंदिर हे विजयनगर काळात (१३३६-१५६५) बांधले गेले असावे, असे मानले जाते. मंदिरातील देवतेचे निवासस्थान अनेकदा नाम पेरुमल आणि अढागिया मानवलन म्हणून ओळखले जाते. 
तामिळमध्ये याचा अर्थ 'आमचा देव' आणि 'सुंदर वर' असा होतो. भव्य असे रंगनाथस्वामी मंदिर भगवान रंगनाथाचे निवासस्थान आहे, हे भगवान विष्णूचे रूप आहे. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी संस्कृतमध्ये घोषणा देत पंतप्रधानांचे विशेष स्वागत केले.
(7 / 7)
तामिळमध्ये याचा अर्थ 'आमचा देव' आणि 'सुंदर वर' असा होतो. भव्य असे रंगनाथस्वामी मंदिर भगवान रंगनाथाचे निवासस्थान आहे, हे भगवान विष्णूचे रूप आहे. यावेळी मंदिराच्या पुजाऱ्यांनी संस्कृतमध्ये घोषणा देत पंतप्रधानांचे विशेष स्वागत केले.(ANI)

    शेअर करा