मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  मेट्रोसह ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन, PHOTOS च्या माध्यमातून पाहा मोदींचा मुंबई दौरा

मेट्रोसह ४० हजार कोटींच्या विकासकामांचं उद्घाटन, PHOTOS च्या माध्यमातून पाहा मोदींचा मुंबई दौरा

Jan 20, 2023, 12:10 AMIST

PM Modi Mumbai Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज मुंबईतील मेट्रोसह विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन पार पडले. मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुंबईत ४० हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. मोदींच्या या दौऱ्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात होती. 

बीकेसी येथे पार पडलेल्या सभेत अपेक्षेप्रमाणे मोदींनी मुंबईच्या विकासकामांवर भाष्य करताना दिल्ली, महाराष्ट्रासोबत मुंबईतही भाजपला सत्ता देण्याचे आव्हान जनतेला करत. ट्रिपल इंजिन सरकारचे महत्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीकेचे बाणही सोडले. मुंबईत पैसा खूप आहे. मात्र योग्य जागी व जनतेच्या हितासाठी खर्च करणारे लोक नसल्याचा टोला उद्धव ठाकरेंचे नाव न घेता लगावला.
(1 / 6)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोदींचे तोंडभरून कौतुक करताना मुंबईचा येत्या तीन वर्षात कायापालट करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्रात व राज्यात आपले सरकार आहे आता मुंबईतही आपली सत्ता येणार असल्याचे शिंदे म्हणाले.त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांना कामातून उत्तर देऊ असा टोला लगावला.
(2 / 6)

यावेळी फडणवीस म्हणाले की, मोदी जगातील लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा जगात डंका वाजत आहे. मोदींच्या हस्ते आज ४० हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन होत आहे. सभेनंतर मोदी गुंदवली मेट्रो स्थानका दाखल झाले. येथून त्यांनी मेट्रो प्रवासही केला. लोकार्पणानंतर शुक्रवारी दुपारी चारनंतर मेट्रो २ अ आणि ७ मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे.  
(3 / 6)

नरेंद्र मोदी यांनी मुंबई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. त्यानंतर त्यांनी गुंदवली ते मोगरापाडा या दरम्यान मेट्रोचा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी तरुण आणि महिलांशी संवाद साधला. 
(4 / 6)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, दावोसमध्ये विविध देशाचे नेते केवळ मोदींबद्दल विचारायचे. एका पंतप्रधानाने सांगितले की, की मोदींचा भक्त आहे. त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला व म्हणाले की, हा फोटा मोदींना दाखला. जर्मनी, सौदी व अन्य देशातील लोकांनी मला विचारले की, तुम्ही मोदींबरोबर आहात ना, मी त्यांना म्हटलं आम्ही त्यांचीच माणसं आहोत. यानंतर सभेत मोदी मोदीचा जयघोष सुरू झाला.
(5 / 6)

मुबई मेट्रो लोकार्पणासोबतच मोदींच्या हस्ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनसच्या पुनर्विकासाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी १८०० कोटी रुपये खर्चू केले जाणार आहेत 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'चे लोकार्पण. सहा हजार कोटींच्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला गेला.
(6 / 6)

    शेअर करा