मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pandharpur : माघी वारीनिमित्त टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमगुमली, PHOTO

Pandharpur : माघी वारीनिमित्त टाळ-मृदंगाचा गजर अन् हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमगुमली, PHOTO

Feb 01, 2023, 07:49 PMIST

Maghiwari Pandharpur : श्री क्षेत्र पंढरपूर येथे माघी यात्रा बुधवारीपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक शहरात डेरे दाखल झाले आहे. पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अनेक ठिकाणी प्रत्यक्ष व सीसीटिव्ही द्वारे निगराणी ठेवली जात आहे.

माघी वारीनिमित्त अनेक दिंड्या, पालख्या मंगळवारी (ता. ३१) पंढरीत दिवसभर दाखल होत राहिल्या. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली. 
(1 / 6)

एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर सदस्य दिनेशकुमार कदम यांच्या हस्ते रुक्मिणी ची महापूजा पार पडली.
(2 / 6)

माघ वारी पंढरपुरात वर्षातील चार महत्त्वाच्या वाऱ्यांपैकी एक गणली जाते. माघी एकादशीला जया एकादशी असेही संबोधले जाते. मागच्यावर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे वारीवर परिणाम झाला होता. पण यंदा पूर्ण क्षमतेने ही वारी भरली जात आहे. सुमारे पाच लाखांहून अधिक वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत.
(3 / 6)

या वारीला सोलापूरची वारी म्हणूनही गणले जाते. त्यामुळे या वारीत जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या दिंड्या आणि पालखी सोहळे सर्वाधिक पंढरपुरात येतात. 
(4 / 6)

माघी वारीला सोलापूर जिल्ह्यासह कोकण आणि मराठवाड्यातूनही दिंड्या पंढरीत येतात. माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध पानाफुलांची आकर्षक , मनमोहक सजावट करण्यात आली आहे आहे. त्यामुळे दर्शनासाठी आलेल्या भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे
(5 / 6)

दशमीच्या स्नानाला विशेष महत्त्व असल्याने चंद्रभागा तिरी वारकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्याशिवाय विठ्ठल मंदिराचा परिसर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रस्ता या भागातही वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. 
(6 / 6)

    शेअर करा