मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Pakistan Floods : पाकिस्तानमध्ये महापूराचा हाहाकार; हजारावर लोक मृत्यूमुखी, पाहा PHOTOS

Pakistan Floods : पाकिस्तानमध्ये महापूराचा हाहाकार; हजारावर लोक मृत्यूमुखी, पाहा PHOTOS

Aug 30, 2022, 03:59 PMIST

Pakistan Floods 2022 : पाकिस्तानमध्ये इतिहासातील सर्वात महाभयंकर महापूर आला आहे. सध्या देशातील ९० टक्के भागात पूरस्थिती असून ६६ जिल्ह्यांमध्ये मदत व बचावकार्य जारी आहे.

  • Pakistan Floods 2022 : पाकिस्तानमध्ये इतिहासातील सर्वात महाभयंकर महापूर आला आहे. सध्या देशातील ९० टक्के भागात पूरस्थिती असून ६६ जिल्ह्यांमध्ये मदत व बचावकार्य जारी आहे.
pakistan floods affected areas : गेल्या १५ दिवसांपासून पाकिस्तानात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं देशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के लोकसंख्या महापूरानं प्रभावित झाली आहे.
(1 / 6)
pakistan floods affected areas : गेल्या १५ दिवसांपासून पाकिस्तानात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं देशात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के लोकसंख्या महापूरानं प्रभावित झाली आहे.(AP)
पाकिस्तानातील सिंध, स्वात, बलुचिस्तान, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात महापूरानं थैमान घातलं असून त्यामुळं रस्ते, पिकं आणि पूल वाहून गेले आहेत. याशिवाय गेल्या आठवड्यापासून पूरामुळं एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
(2 / 6)
पाकिस्तानातील सिंध, स्वात, बलुचिस्तान, पंजाब आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतात महापूरानं थैमान घातलं असून त्यामुळं रस्ते, पिकं आणि पूल वाहून गेले आहेत. याशिवाय गेल्या आठवड्यापासून पूरामुळं एक हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.(AFP)
महापूरामुळं पाकिस्तानच्या सरकारनं देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.
(3 / 6)
महापूरामुळं पाकिस्तानच्या सरकारनं देशात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे.(AFP)
पाकिस्तानमध्ये आलेल्या या महापूरात आतापर्यंत १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचं नुकसान झालं आहे. त्यामुळं पाकिस्तानच्या नियोजनमंत्र्यांनी मानवनिर्मित हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
(4 / 6)
पाकिस्तानमध्ये आलेल्या या महापूरात आतापर्यंत १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्तीचं नुकसान झालं आहे. त्यामुळं पाकिस्तानच्या नियोजनमंत्र्यांनी मानवनिर्मित हवामान बदलाच्या परिणामांचा सामना करणाऱ्या पाकिस्तानला मदत करण्याचं आवाहन केलं आहे.(AP)
याशिवाय अन्न टंचाई आणि औषधांच्या तुटवड्यामुळं पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे.
(5 / 6)
याशिवाय अन्न टंचाई आणि औषधांच्या तुटवड्यामुळं पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे.(AP)
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आतापर्यंत ३०६, बलुचिस्तानमध्ये २३४, खैबर पख्तूनख्वामध्ये १८५, पंजाबमध्ये १६५ आणि पीओकेमध्ये ३७ लोकांना महापूरामुळं जीव गमवावा लागला आहे.
(6 / 6)
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आतापर्यंत ३०६, बलुचिस्तानमध्ये २३४, खैबर पख्तूनख्वामध्ये १८५, पंजाबमध्ये १६५ आणि पीओकेमध्ये ३७ लोकांना महापूरामुळं जीव गमवावा लागला आहे.(AP)

    शेअर करा