मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Mumbai Pune expressway traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; बोरघाटात तब्बल १५ किमी पर्यंत रांगा

Mumbai Pune expressway traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; बोरघाटात तब्बल १५ किमी पर्यंत रांगा

Mar 09, 2024, 06:10 AMIST

Mumbai Pune expressway traffic Jam : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (mumbai pune express way traffic update) शुक्रवारी मध्यरात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे तब्बल १५ किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या.  अवजड वाहने, लेनशिस्त भंग या मुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती.

  • Mumbai Pune expressway traffic Jam : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर (mumbai pune express way traffic update) शुक्रवारी मध्यरात्री प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे तब्बल १५ किमी पर्यंत रांगा लागल्या होत्या.  अवजड वाहने, लेनशिस्त भंग या मुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती.
पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाट लोणावळ्यापर्यंत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा  लागल्या होत्या. 
(1 / 5)

या मार्गावर रात्रीच्या वेळी कोणत्याही प्रकारच्या लेनची शिस्त पाळल्या जात नव्हती. या वाहतूक कोंडीत अॅम्बुलन्ससारखी वाहने आणि काही मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा अडकून पडल्या होत्या. यामुळे या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. 
(2 / 5)

वाहतूक कोंडीत एका मंत्र्याची गाडी विरुद्ध दिशेने वळवण्यात येऊन त्यांना जुन्या पुणे-मुंबई मार्गांनी नेण्यात आले. या मार्गावर रात्रीच्या वेळी अवजड वाहने सोडल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते.
(3 / 5)

 शुक्रवारी मध्यरात्री सुध्दा अशीच वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झाले होते. त्यातच अनेक ट्रक आणि चार चाकी गाड्या येथे बंद पडल्या.  त्याहीमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. 
(4 / 5)

बोरघाट महामार्ग पोलीस कक्षाला संपर्क करायला, टोल फ्री क्रमांक असला तरी त्यावर यावेळी प्रतिसाद मिळाला नाही. येथे महामार्ग पोलिसांचे वाहतूक कोंडी होण्याच्या कारणांकडे दुर्लक्ष होत चालले आहे. त्याचा परिणाम असा रात्री अपरात्री या द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. शुक्रवारी याठिकाणी कोणताही पोलीस कर्मचारी येथील वाहतूक कोंडी सोडवताना पाहायला मिळाला नाही. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
(5 / 5)

    शेअर करा