मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  World Cup 2023 : विराट ते बाबर! हे ५ फलंदाज चालले तरच त्यांचे संघ वर्ल्डकप जिंकू शकतात, पाहा

World Cup 2023 : विराट ते बाबर! हे ५ फलंदाज चालले तरच त्यांचे संघ वर्ल्डकप जिंकू शकतात, पाहा

Oct 04, 2023, 08:56 PMIST

world cup 2023 top 5 batsman : क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक उद्यापासून (५ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होईल. या विश्वचषकात असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.

  • world cup 2023 top 5 batsman : क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक उद्यापासून (५ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना होईल. या विश्वचषकात असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण जगाचे लक्ष असेल.
क्रिकेटचा सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच एकदिवसीय विश्वचषक उद्यापासून (५ ऑक्टोबर) खेळवला जाणार आहे. या विश्वचषकात विराट कोहली, बाबर आझम, स्टीव्ह स्मिथसह असे काही फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष असेल.
(1 / 6)

बेन स्टोक्स - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एकदिवसीय विश्वचषकासाठी वनडेतून निवृत्ती मागे घेतली आहे. स्टोक्स या विश्वचषकात इंग्लंडसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीही करू शकतो. त्याला भारतीय खेळपट्ट्या माहीत आहेत आणि तो खूप अनुभवीही आहे. या विश्वचषकात बेन स्टोक्सच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
(2 / 6)

रोहित शर्मा - गेल्या विश्वचषकाचा हिरो रोहित शर्मा यावेळीही चमत्कार करू शकतो. २०१९ च्या विश्वचषकात रोहितने ५ शतके झळकावून संपूर्ण जगाला चकित केले होते. यावेळीही रोहितच्या बॅटमधून शतकांची बरसात होऊ शकते. रोहितने विश्वचषकापूर्वीच आपण आक्रमक फलंदाजी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत त्याची फलंदाजी पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
(3 / 6)

स्टीव्ह स्मिथ-  स्टीव्ह स्मिथचाही हा शेवटचा विश्वचषक असू शकतो. या विश्वचषकात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये स्मिथ हा संघाच्या फलंदाजीतील महत्त्वाचा दुवा ठरला आहे. मात्र, यावेळी विश्वचषक भारतामध्ये खेळला जात असल्याने संघाला स्मिथची आणखी गरज आहे. स्मिथ भारतीय खेळपट्ट्यांवर सहज धावा करण्यात पटाईत आहे. 
(4 / 6)

बाबर आझम - पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच्या सराव सामन्यांमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपली दमदार शैली दाखवून दिली आहे. मात्र, बाबर पहिल्यांदाच भारतात आला आहे. अशा स्थितीत त्याची फलंदाजी पाहण्याची सर्वांनाच इच्छा आहे. बाबरचा फॉर्म पाहता विश्वचषकात तो सहज २ ते ३ शतके झळकावू शकतो.
(5 / 6)

 विराट कोहली - भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा स्टार विराट कोहलीने आशिया कप 2023 मध्ये आपल्या फॉर्मचा पुरावा दिला आहे. विराटचे पाकिस्तानविरुद्धचे शतक वर्षानुवर्षे स्मरणात राहील. ३४ वर्षीय विराट कोहलीचा हा शेवटचा विश्वचषकही असू शकतो. विशेष म्हणजे, विराट विश्वचषकात शतक झळकावणारा सर्वात तरुण भारतीय फलंदाज आहे. किंग कोहलीने २०११ मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला होता.
(6 / 6)

    शेअर करा