मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Novak Djokovic: जेलेना-जोकोविचची 'स्कूल वाली लव्हस्टोरी'

Novak Djokovic: जेलेना-जोकोविचची 'स्कूल वाली लव्हस्टोरी'

Jul 11, 2022, 03:41 PMIST

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे. त्याने रविवारी (१० जुलै) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा चार सेटमध्ये पराभव केला.

  • सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने सातव्यांदा विम्बल्डन ओपन जिंकले आहे. त्याने रविवारी (१० जुलै) पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसचा चार सेटमध्ये पराभव केला.
नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन २०२२ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत जोकोविचने ऑस्ट्रेलियन खेळाडू निक किर्गिओसचा ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना ३ तास चालला.
(1 / 9)
नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन २०२२ मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या अंतिम फेरीत जोकोविचने ऑस्ट्रेलियन खेळाडू निक किर्गिओसचा ४-६, ६-३, ६-४, ७-६ (७-३) असा पराभव केला. दोन्ही खेळाडूंमधील हा सामना ३ तास चालला.(Novak Djokovic, instagram)
जोकोविचचे हे सातवे विम्बल्डन आणि एकूण २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. आता पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच स्पेनच्या राफेल नदालपासून फक्त एक विजेतेपद दूर आहे. राफेल नदालने एकूण २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.
(2 / 9)
जोकोविचचे हे सातवे विम्बल्डन आणि एकूण २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. आता पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत जोकोविच स्पेनच्या राफेल नदालपासून फक्त एक विजेतेपद दूर आहे. राफेल नदालने एकूण २२ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकली आहेत.(Novak Djokovic, instagram)
नोव्हाक जोकोविचची लव्ह लाईफही खूप रोमँटिक आहे. नोव्हाक जोकोविचने जेलेना जोकोविचशी लग्न केले. जोकोविच आणि जेलेना यांची पहिली भेट २००५ मध्ये हायस्कूलमध्ये झाली होती. तेव्हापासून जोकोविच आणि जेलेना एकमेकांना डेट करू लागले.
(3 / 9)
नोव्हाक जोकोविचची लव्ह लाईफही खूप रोमँटिक आहे. नोव्हाक जोकोविचने जेलेना जोकोविचशी लग्न केले. जोकोविच आणि जेलेना यांची पहिली भेट २००५ मध्ये हायस्कूलमध्ये झाली होती. तेव्हापासून जोकोविच आणि जेलेना एकमेकांना डेट करू लागले.(Novak Djokovic, instagram)
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेलेना MBA करण्यासाठी इटलीतील मिलान शहरात गेली. तर जोकोविचनेही आपले लक्ष टेनिसवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. एकमेकांपासून दूर गेल्यानंतरही जोकोविच आणि जेलेना यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.
(4 / 9)
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेलेना MBA करण्यासाठी इटलीतील मिलान शहरात गेली. तर जोकोविचनेही आपले लक्ष टेनिसवर केंद्रित करण्यास सुरुवात केली. एकमेकांपासून दूर गेल्यानंतरही जोकोविच आणि जेलेना यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.(Novak Djokovic, instagram)
जवळपास ८ वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१३ मध्ये जोकोविच आणि जेलेनाने एंगेजमेंट केली. त्यानंतर १० जुलै २०१४ रोजी दोघांनी सर्बियातील मॉन्टेनेग्रो येथे लग्नगाठ बांधली. लग्नाबद्दल जोकोविच म्हणाला होता, 'जेलेनाला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती एखाद्या परीसारखी दिसत होती. काही केल्या माझी नजर तिच्यावरुन हटत नव्हती. मी फक्त तिच्याकडेच पाहत राहिलो आणि मनातल्या मनात आनंदी होत होतो.'
(5 / 9)
जवळपास ८ वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१३ मध्ये जोकोविच आणि जेलेनाने एंगेजमेंट केली. त्यानंतर १० जुलै २०१४ रोजी दोघांनी सर्बियातील मॉन्टेनेग्रो येथे लग्नगाठ बांधली. लग्नाबद्दल जोकोविच म्हणाला होता, 'जेलेनाला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा ती एखाद्या परीसारखी दिसत होती. काही केल्या माझी नजर तिच्यावरुन हटत नव्हती. मी फक्त तिच्याकडेच पाहत राहिलो आणि मनातल्या मनात आनंदी होत होतो.'(Novak Djokovic, instagram)
नोवाक आणि जेलेना यांना दोन मुलं आहेत. नोव्हाक जोकोविच एक फाउंडेशन देखील चालवतो, जे त्याची पत्नी जेलेना हाताळते. 
(6 / 9)
नोवाक आणि जेलेना यांना दोन मुलं आहेत. नोव्हाक जोकोविच एक फाउंडेशन देखील चालवतो, जे त्याची पत्नी जेलेना हाताळते. (Novak Djokovic, instagram)
नोव्हाक जोकोविच फाउंडेशन सर्बियातील मुलांना त्यांचे शालेय शिक्षण आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करते.
(7 / 9)
नोव्हाक जोकोविच फाउंडेशन सर्बियातील मुलांना त्यांचे शालेय शिक्षण आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत करते.(Novak Djokovic)
नोव्हाक जोकोविच यावर्षी अनेक वादांच्या केंद्रस्थानीही राहिला आहे. जोकोविचला या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना लस न दिल्याने ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षातील पहिले ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो सहभागी होऊ शकला नाही. यूएस ओपनमध्येही जोकोविचचे खेळणेही निश्चित नाही.
(8 / 9)
नोव्हाक जोकोविच यावर्षी अनेक वादांच्या केंद्रस्थानीही राहिला आहे. जोकोविचला या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना लस न दिल्याने ऑस्ट्रेलियातून हद्दपार करण्यात आले आहे. त्यामुळे या वर्षातील पहिले ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तो सहभागी होऊ शकला नाही. यूएस ओपनमध्येही जोकोविचचे खेळणेही निश्चित नाही.(Novak Djokovic)
Novak Djokovic
(9 / 9)
Novak Djokovic(Novak Djokovic)

    शेअर करा