मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  NDA 144th Passing out parade : देश रक्षणासाठी आम्ही सज्ज; एनडीएत दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा, पाहा फोटो

NDA 144th Passing out parade : देश रक्षणासाठी आम्ही सज्ज; एनडीएत दिमाखदार दीक्षांत संचलन सोहळा, पाहा फोटो

May 30, 2023, 01:06 PMIST

National defence academy 144th course passing out parade ceremony : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. 

  • National defence academy 144th course passing out parade ceremony : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून गेले तीन वर्षे प्रबोधिनीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम पग’ ओलांडत, जल्लोष केला. 
तीन वर्षांचे यशस्वीपणे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण... देशसेवेसाठी सज्ज असणारे तरुण... भविष्यातील आव्हानाला सामोरे जाण्याचा त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास... अशा उत्साही वातावरणात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा १४४ व्या तुकडीचा शिस्तबद्ध दीक्षांत सोहळा मंगळवारी खेत्रपाल परेड ग्राऊंडवर दिमाखात पार पडला.  चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल अनिल चव्हाण  यांनी विद्यार्थ्यांची मानवंदना स्विकारत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 
(1 / 9)

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत देशातील तिन्ही दलातील अधिकाऱ्यांना संयुक्त  प्रशिक्षण दिले जाते. यंदा प्रबोधिनेचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून  या वर्षी १४४ वा कोर्स उत्तीर्ण होणे ही अभिमानाची बाब आहे, असे सीडीएस चौहान म्हणाले. 
(2 / 9)

१४४  वा कोर्सची सुरुवात जून २०२० मध्ये झाली. तीन वर्षांचे कठोर लष्करी प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आज कॅडेट्स पुढील लष्करी प्रशिक्षणासाठी  जाणार आहेत.  
(3 / 9)

आज झालेल्या संचलनात तब्बल १ हजार १७५  कॅडेट्स सहभागी झाले होते.  त्यापैकी ३५६ कॅडेट्स पासिंग आऊट कोर्सचे होते. यामध्ये २१४ आर्मी कॅडेट्स, ३६  नेव्हल कॅडेट आणि १०६ एअर फोर्स कॅडेट्स समाविष्ट होते.
(4 / 9)

मित्र देश असलेले भूतान, ताजिकिस्तान, मालदीव, अफगाणिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश येथील  १९ कॅडेट्स यांचा समावेश आहे. 
(5 / 9)

या वर्षी  आफ्रिद अफरोझ याने गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत प्रथम स्थान मिळवत राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. तर  अंशू कुमारने गुणवत्तेच्या एकूण क्रमवारीत दूसरा येत  राष्ट्रपतींचे रौप्य पदक जिंकले. तर  प्रवीण सिंग याने  एकूण गुणवत्तेच्या क्रमाने तिसरा येत  राष्ट्रपतींचे कांस्य पदक जिंकले.
(6 / 9)

रोमियो स्क्वॉड्रनने प्रतिष्ठित 'चीफ ऑफ स्टाफ बॅनर' जिंकला, जो दीक्षांत संचलन सोहळ्या,  दरम्यान सादर करण्यात आला.
(7 / 9)

सीडीएस अनिल चौहान यांनी दीक्षांत संचलन सोहळ्याची पाहणी केली. तसेच उत्तीर्ण कोर्स कॅडेट्स, पदक विजेते आणि चॅम्पियन स्क्वाड्रन यांनी केलेल्या कठोर परिश्रम आणि जबरदस्त कामगिरीबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
(8 / 9)

 यासोबत या कोर्समध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्याच्या पालकांना त्यांनी सशस्त्र दलात सामील होण्यासाठी पाठवल्याबद्दल त्यांचे  आभार मानले. लष्करात संयुक्तपणाची भावना पुढे नेण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना  प्रोत्साहित केले.  
(9 / 9)

    शेअर करा