मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  शिवानी नाईक ते शीतल क्षीरसागर; आईपण अनुभवल्या शिवाय आईच्या भूमिका गाजवणाऱ्या नायिका

शिवानी नाईक ते शीतल क्षीरसागर; आईपण अनुभवल्या शिवाय आईच्या भूमिका गाजवणाऱ्या नायिका

May 09, 2024, 10:43 AMIST

कलाकारांना वाट्याला येईल ती भूमिका साकारावी लागते. काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आईपण अनुभवल्या शिवाय आईच्या भूमिका गाजवल्या आहेत. या अभिनेत्री कोणत्या जाणून घेऊया...

  • कलाकारांना वाट्याला येईल ती भूमिका साकारावी लागते. काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आईपण अनुभवल्या शिवाय आईच्या भूमिका गाजवल्या आहेत. या अभिनेत्री कोणत्या जाणून घेऊया...
आई ही प्रत्येकाच्या जीवनाचा आधारस्तंभ असते. अशा या आईच्या उपकाराची जाणीव ठेवून जगभरात मातृत्व आणि मातांचा सन्मान करण्यासाठी ‘मदर्स डे’ साजरा केला जातो. टीव्ही जगतात अश्या काही नायिका आहेत ज्यांनी खऱ्या आयुष्यात अजून आईपण अनुभवले नाहीये पण त्या खूप सहज सुंदरपणे स्क्रीनवर आईची भूमिका साकारत आहेत. झी मराठीच्या अशा काही नायिकांविषयी…
(1 / 5)

अप्पी आमची कलेक्टर मालिकेतील अप्पी म्हणजेच  शिवानी नाईक ही मुलाचा सांभाळ एकटी करत असल्याचे दिसत आहे. "अप्पीच्या प्रेग्नेंसी पासूनच आईपण आपोआपच अंगात आलं होतं. माझ्या मते प्रत्येक बाई मध्ये आईपण असतंच. मालिकेत अप्पीचा पूर्ण प्रवास दाखवलाय, ती लग्नाच्या आधी कशी होती, तिचा कलेक्टर होण्याचा प्रवास, लग्नानंतरचा प्रवास आणि आता तिच्या पदरात आईपण आलं आहे. मी अप्पीचा प्रवास प्रत्येक वाटचालीवर अनुभवला आहे आणि जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ही हावभावांची काळजी घेणं त्यानंतर ही जेव्हा अप्पीच बाळ गेलंय ह्यावर तिचा विश्वास न बसणे, ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टींवर आम्ही बारीक लक्ष दिले आहे. आता ७ वर्ष नंतरही अप्पीने    एकटीनेच अमोलच संगोपन केलंय, त्याला चांगले छान संस्कार दिलेत, त्याला हुशारी ही तिकीच शिकवली आहे. अप्पीची भूमिका पहिल्यापासून निभावत आहे म्हणून तिचा पूर्ण प्रवास जगायला मला खूप आवडत आहे. खूप मज्जा येतेय आईपण स्क्रीनवर साकारायला" असे अप्पी म्हणाली.
(2 / 5)

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीलाच्या मावशी आईची भूमिका साकारत आहे शीतल क्षीरसागर साकारत आहे. ती देखील आईपण अनुभवल्या शिवाय आईच्या भूमिका गाजवत आहे. "खऱ्या आयुष्यात माझं लग्न नाही झालंय आणि स्क्रीनवर इतक्या मोठ्या मुलींची आई साकारणं नक्कीच आव्हानात्मक आहे.  पण मला असं वाटत एक स्त्री असल्यामुळे तितकं कठीण नाही त्याच कारण असं की प्रत्येक स्त्री मध्ये नैसर्गिक आईपणाचे  गुण असतातच. मी माझ्या घरातली मोठी मुलगी आहे मला लहान भावंडं आहेत. माझे आई- वडील नोकरी करायचे त्यामुळे मी माझ्या लहान भावंडांना सांभाळताना कधी-कधी त्यांची आई व्हायचे.  ते वेळेवर जेवतायत का, आईनि सांगितलेल्या गोष्टींप्रमाणे त्यांचा सांभाळ होतोयना ह्यासर्व  अनुभवांचा उपयोग मी भूमिका करताना करते. त्याशिवाय माझा भाचा ओजस हा माझा भाचा नसून माझ्या मोठा मुलगाच आहे. त्याच्यामुळे ही मी खूप सुंदर अनुभव घेतले आहेत. मी त्याला जन्म जरी दिला नसला तरी त्याच्या संगोपनात माझा खारीचा वाटा आहे. माझ्या आईच आणि समाजात इतर आयांचं निरीक्षण करून मला रेऊ आणि लीलाची स्क्रीनवर आई निभावयला मदत होते . या सगळ्यामुळे मला माझी आई सुद्धा नव्याने कळतेय" असे ती म्हणाली.
(3 / 5)

'पुन्हा कर्तव्य आहे' मध्ये बनीच्या आईची भूमिका साकारत असलेली अक्षया हिंदाळकर ही देखील चर्चेत आहे. "मला असं कायम वाटतं की स्त्रियांमध्ये जन्मजातच ममता असतेच.  म्हणून मला असं जास्त काही वेगळं करावे नाही लागलं. ऑफकोर्स काही प्रोसेस मधून जावे लागलं.  माझा छोटा भाऊ आहे जो माझ्या मामाचा मुलगा आहे तो माझ्या आयुष्यात आल्यावर मला आईपण काय आहे ते जाणवलं. आमच्या मालिकेचे दिर्दर्शक शैलेश सर त्यांनी खूप छानपणे माझ्या मधली आई स्क्रीनवर साकारण्यात मदत केली आहे. वसूचे पात्र माझ्यापेक्षा ७-८ वर्ष मोठं आहे आणि तिचा तेवढाच मोठा मुलगा आहे. तर ती भावना रोज स्क्रीनवर साकारायची ह्यावर नक्की मला मेहनत करावी लागली पण आईपणाची भावना आत होतीच" असे ती म्हणाली.
(4 / 5)

‘पारू’ मालिकेतील आदित्य आणि प्रीतम किर्लोस्करची आई अहिल्यादेवी म्हणजेच  मुग्धा कर्णिक " मी खऱ्या आयुष्यात आई नाही पण जे आपण खऱ्या आयुष्यात नाही आहोत ते स्क्रीनवर साकारण्याचं आव्हान मला खूप आवडतं. भूमिका जर अप्रतिम असेल तर लहान मुलांची आई असो किंवा मोठ्या मुलांची आई त्याने जास्त काही  फरक नाही पडत. मी भूमिकेच्या प्रेमात पडून त्यात जे घडवायचे आहे ते स्क्रीनवर आपण किती चांगलं दाखवू शकतो त्यासाठी मेहनत करते, म्हणून मला फरक नाही पडत की मी किती मोठयामुलांची आई साकारत आहे. माझ्या आई कडून मला ताकत मिळाली आहे. तिच्याकडे असलेला कणखरपणा जो आहे,  कितीही कठीण  वेळ आली तरी त्याला सामोरे जायचे. कधी मी तिला प्रॉब्लेम्सला घाबरताना पहिले नाही कारण तीच म्हणणं आहे की अडचणी सोडवायच्या असतात. मी कामाची नैतिकताही तिच्याकडून शिकले,  तिला तिचं काम खूप आवडतं माझी आई ३५ वर्ष जे.जे हॉस्पिटल मध्ये आनंदानी काम करत राहिली कधी कंटाळा केला नाही.
(5 / 5)

    शेअर करा