मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Drone attack : अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला; भारतीय तटरक्षक दलाने केले एमव्ही केम प्लुटोला एस्कॉर्ट, पाहा फोटो

Drone attack : अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला; भारतीय तटरक्षक दलाने केले एमव्ही केम प्लुटोला एस्कॉर्ट, पाहा फोटो

Dec 26, 2023, 08:39 AMIST

Merchant Vessel MV Chem Pluto : इस्रायलचे व्यापारी जहाज सौदी अरेबियातून क्रूड ऑईल घेऊन मंगळुरूकडे येत असताना गुजरातनजीकच्या अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. हे जहाज अखेर मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले असून भारतीय तटरक्षक दलाने या जहाजाला एस्कॉर्ट करत मुंबई जवळ पोहचवलं. 

  • Merchant Vessel MV Chem Pluto : इस्रायलचे व्यापारी जहाज सौदी अरेबियातून क्रूड ऑईल घेऊन मंगळुरूकडे येत असताना गुजरातनजीकच्या अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता. हे जहाज अखेर मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचले असून भारतीय तटरक्षक दलाने या जहाजाला एस्कॉर्ट करत मुंबई जवळ पोहचवलं. 
इस्रायलचे व्यापारी जहाज सौदी अरेबियातून क्रूड ऑईल घेऊन मंगळुरूकडे येत असताना गुजरातनजीकच्या अरबी समुद्रात जहाजावर ड्रोन हल्ला झाला. या हल्ल्यात जहाजावर आग लागली आहे. या जहाच्या मदतीसाठी भारताने एक युद्धनौका पाठवली आहे. इंडियन कोस्ट गार्डच्या सहाय्यानं अखेर जहाज मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. या जहाजावर इराणने ड्रोन हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. मात्र, हा हल्ला केल्याचा इराणने नकार दिला आहे. 
(1 / 6)

२३  डिसेंबरला सौदी अरेबियातून मंगळुरूला येणाऱ्या एमव्ही केम प्लुटो  या व्यापारी जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. या जहाजावर लायबेरियाचा ध्वज होता. व या जहाजावर २१  भारतीय खलाशी होते.  नौदल या हल्ल्याची चौकशी करणार आहे.
(2 / 6)

या ड्रोन हल्ल्यात  एमव्ही केम प्लुटो जहाजाचे मोठ्या  नुकसान झाले आहे. या हल्ल्याची चौकशी भारतीय नौदल करत आहे. हा हल्ला अरबी समुद्रात हा हल्ला करण्यात याला याचा देखील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय नौदलाच्या युद्धनौका भारतीय आणि इतर जहाजांच्या सुरक्षेसाठी परिसरात गस्त घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
(3 / 6)

मिळालेल्या माहितीनुसार या जहाजात २१  भारतीय होते. सोमवारी हे जहाज  मुंबई बंदरात पोहोचल्यानंतर भारतीय नौदलाच्या एक्सप्लोझिव्ह ऑर्डिनन्स डिस्पोजल पथकाने जहाजाची तपासणी केली. 
(4 / 6)

दरम्यान, हा हल्ला झाल्यावर भारतीय तटरक्षक दलाच्या ICGS विक्रमला या जहाजाच्या मदतीसाठी पाठवण्यात आले होते. ICGS विक्रमने या जहाजाला एस्कॉर्ट करत ते मुंबईच्या किनाऱ्यावर आणण्यात आले.  
(5 / 6)

हा ड्रोन हल्ला इराणने केल्याचा दावा अमेरिकन संरक्षण विभागाचे मुख्यालय पेंटागॉनने केला आहे. पेंटागॉनने रविवारी एका निवेदनात म्हटले आहे की हा हल्ला स्थानिक वेळेनुसार सकाळी १० च्या सुमारास झाला. मात्र, जपानच्या मालकीच्या असणाऱ्या या जहाजावर या हल्ल्यामुळे आग लागली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लवकरच विझवण्यात आली. 
(6 / 6)

    शेअर करा