मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Joshimath Sinking : बद्रीनाथचं प्रवेशद्वार ढासळण्याच्या वाटेवर; जोशीमठ जमिनीत का धसतंय?

Joshimath Sinking : बद्रीनाथचं प्रवेशद्वार ढासळण्याच्या वाटेवर; जोशीमठ जमिनीत का धसतंय?

Jan 09, 2023, 09:09 AMIST

Joshimath Sinking Update : जमीन खचत असल्यानं अनेक घरांमध्ये तडे गेले असून रस्तेही उखडले आहेत. त्यामुळं भूस्खलनाच्या भीतीनं अनेक लोकांनी दुसऱ्या शहरात स्थलांतर करायला सुरुवात केली आहे.

  • Joshimath Sinking Update : जमीन खचत असल्यानं अनेक घरांमध्ये तडे गेले असून रस्तेही उखडले आहेत. त्यामुळं भूस्खलनाच्या भीतीनं अनेक लोकांनी दुसऱ्या शहरात स्थलांतर करायला सुरुवात केली आहे.
joshimath sinking video : उत्तराखंडमधील बद्रीनाथचं प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमीन खचत असल्याच्या घटना समोर येत आहे.
(1 / 12)
joshimath sinking video : उत्तराखंडमधील बद्रीनाथचं प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमीन खचत असल्याच्या घटना समोर येत आहे.(HT)
Joshimath Sinking Update : जोशीमठमधील अनेक घरांना तडे गेले असून रस्तेही उखडले आहेत. त्यामुळं भूस्खलन आणि भूकंपाच्या भीतीनं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
(2 / 12)
Joshimath Sinking Update : जोशीमठमधील अनेक घरांना तडे गेले असून रस्तेही उखडले आहेत. त्यामुळं भूस्खलन आणि भूकंपाच्या भीतीनं नागरिकांनी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.(HT)
joshimath current situation : मोठमोठी घरं आणि महामार्गावरील रस्ते जमीनीत धसत असल्यामुळं आता जिल्हा प्रशासनानं तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केलं असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे आज जोशीमठचा दौरा करणार आहेत.
(3 / 12)
joshimath current situation : मोठमोठी घरं आणि महामार्गावरील रस्ते जमीनीत धसत असल्यामुळं आता जिल्हा प्रशासनानं तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केलं असून उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी हे आज जोशीमठचा दौरा करणार आहेत.(HT)
joshimath sinking video live today : जोशीमठची जमीन राहण्यायोग्य नसल्यामुळं तेथून लोकांनी तात्काळ स्थलांतर करावं, अशा सूचना प्रशासनानं लोकांना दिल्या आहेत.
(4 / 12)
joshimath sinking video live today : जोशीमठची जमीन राहण्यायोग्य नसल्यामुळं तेथून लोकांनी तात्काळ स्थलांतर करावं, अशा सूचना प्रशासनानं लोकांना दिल्या आहेत.(HT)
joshimath cracks images : जोशीमठ हे शहर हिमालयातून झालेल्या भूस्खलनाच्या मलब्यावर वसलेलं असल्यानं तेथील जमीन बांधकामासाठी योग्य नसल्याचं सांगितलं जातं.
(5 / 12)
joshimath cracks images : जोशीमठ हे शहर हिमालयातून झालेल्या भूस्खलनाच्या मलब्यावर वसलेलं असल्यानं तेथील जमीन बांधकामासाठी योग्य नसल्याचं सांगितलं जातं.(HT)
जमीन खचत असल्यामुळं जोशीमठमधील सर्व विकासकामांना आणि वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे.
(6 / 12)
जमीन खचत असल्यामुळं जोशीमठमधील सर्व विकासकामांना आणि वीजनिर्मिती प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली आहे.(HT)
जोशीमठच्या जमीनीतून महामार्गासाठी बोगदा तयार करण्यात येत असल्यामुळंच जमीन खचत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
(7 / 12)
जोशीमठच्या जमीनीतून महामार्गासाठी बोगदा तयार करण्यात येत असल्यामुळंच जमीन खचत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.(HT)
यापूर्वी १९८० मध्येही जोशीमठमध्ये जमीन खचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावेळी सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिश्रा आयोगाची स्थापना केली.  
(8 / 12)
यापूर्वी १९८० मध्येही जोशीमठमध्ये जमीन खचल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यावेळी सरकारनं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मिश्रा आयोगाची स्थापना केली.  (HT)
मिश्रा आयोगानं सरकारला रिपोर्ट सादर करताना त्यात म्हटलं होतं की, जोशीमठ हे निमुळत्या आणि कमकुवत जमीनीवर वसलेलं असल्यानं तेथील औद्योगिक आणि विकासकामांची प्रकल्प थांबवण्यात यावीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात वृश्रलागवड करण्याच्याही शिफारशी मिश्रा आयोगानं केल्या होत्या.
(9 / 12)
मिश्रा आयोगानं सरकारला रिपोर्ट सादर करताना त्यात म्हटलं होतं की, जोशीमठ हे निमुळत्या आणि कमकुवत जमीनीवर वसलेलं असल्यानं तेथील औद्योगिक आणि विकासकामांची प्रकल्प थांबवण्यात यावीत. याशिवाय मोठ्या प्रमाणात वृश्रलागवड करण्याच्याही शिफारशी मिश्रा आयोगानं केल्या होत्या.(HT)
परंतु मिश्रा आयोगाच्या शिफारशींकडे सरकारनं दुर्लक्ष करत राजरोसपणे औद्योगिक प्रकल्पांचं काम सुरुच ठेवल्यानं या घटना घडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
(10 / 12)
परंतु मिश्रा आयोगाच्या शिफारशींकडे सरकारनं दुर्लक्ष करत राजरोसपणे औद्योगिक प्रकल्पांचं काम सुरुच ठेवल्यानं या घटना घडत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.(HT)
बद्रीनाथला जाण्याचा मार्ग हा जोशीमठमधूनच जातो. त्यामुळं जोशीमठचं पुराणांमध्ये आणि रामायणात मोठं महत्त्व सांगण्यात आलं आहे. परंतु आता या घटनांमुळं जोशीमठ निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर आहे.
(11 / 12)
बद्रीनाथला जाण्याचा मार्ग हा जोशीमठमधूनच जातो. त्यामुळं जोशीमठचं पुराणांमध्ये आणि रामायणात मोठं महत्त्व सांगण्यात आलं आहे. परंतु आता या घटनांमुळं जोशीमठ निर्मनुष्य होण्याच्या मार्गावर आहे.(HT)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोशीमठमधील घटनांवर तातडीनं बैठक घेतली असून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत.
(12 / 12)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोशीमठमधील घटनांवर तातडीनं बैठक घेतली असून आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत.(HT)

    शेअर करा