मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Sambhaji Nagar: ठाकरेंच्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी; विधानसभेच्या १८० जागा जिंकण्याचा मविआचा निर्धार

Apr 03, 2023, 12:00 AMIST

Maha Vikas Aaghadi Sabha Sambhaji Nagar : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात विजय मिळवल्यानंतर मविआनं संभाजीनगरमध्ये एकीचं दर्शन देत भाजप-शिंदे गटाविरोधात रणशिंग फुकलं आहे.

  • Maha Vikas Aaghadi Sabha Sambhaji Nagar : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात विजय मिळवल्यानंतर मविआनं संभाजीनगरमध्ये एकीचं दर्शन देत भाजप-शिंदे गटाविरोधात रणशिंग फुकलं आहे.
Maha Vikas Aaghadi Sabha Sambhaji Nagar : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा तीन पक्षांची पहिली संयुक्त सभा (वज्रमुठ) सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभेला उपस्थित होते.
(1 / 8)
Maha Vikas Aaghadi Sabha Sambhaji Nagar : शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा तीन पक्षांची पहिली संयुक्त सभा (वज्रमुठ) सभा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सभेला उपस्थित होते.(Shiv Sena (UBT))
Maha Vikas Aaghadi Sabha : मविआच्या वज्रमुठ सभेत बोलताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या १८० जागांवर विजयाचा दावा केला आहे. त्यामुळं संभाजीनगरमधील सभेतून मविआनं विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे.
(2 / 8)
Maha Vikas Aaghadi Sabha : मविआच्या वज्रमुठ सभेत बोलताना कॉंग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेच्या १८० जागांवर विजयाचा दावा केला आहे. त्यामुळं संभाजीनगरमधील सभेतून मविआनं विधानसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुकलं आहे.(Shiv Sena (UBT))
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
(3 / 8)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ऐकण्यासाठी मराठवाड्यासह विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.(Shiv Sena (UBT))
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहापैकी पाच आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: संभाजीनगरच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आता ठाकरे आणि शिंदे गटासाठी संभाजीनगर आणि मराठवाड्याची लढाई ही वर्चस्व आणि आस्तित्वाची झाली आहे.
(4 / 8)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सहापैकी पाच आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: संभाजीनगरच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळं आता ठाकरे आणि शिंदे गटासाठी संभाजीनगर आणि मराठवाड्याची लढाई ही वर्चस्व आणि आस्तित्वाची झाली आहे.(Shiv Sena (UBT))
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जंगी सभा व्हायच्या. याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार रणशिंग फुकलं आहे.
(5 / 8)
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या जंगी सभा व्हायच्या. याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाविरोधात जोरदार रणशिंग फुकलं आहे.(Shiv Sena (UBT))
राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, सतीश चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे हे स्थानिक नेते पहिल्यांदाच मविआच्या कार्यक्रमााठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
(6 / 8)
राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, सतीश चव्हाण, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे हे स्थानिक नेते पहिल्यांदाच मविआच्या कार्यक्रमााठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.(Shiv Sena (UBT))
संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.
(7 / 8)
संभाजीनगर जिल्हा हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. परंतु आता शिवसेनेत बंड झाल्यामुळं ठाकरे आणि शिंदे गटात जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं चित्र आहे.(Shiv Sena (UBT))
महाविकास आघाडीची संभाजीनगरमधील ही पहिलीच वज्रमुठ सभा आहे. यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मविआकडून सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता विरोधकांची वज्रमुठ तर सत्ताधाऱ्यांची सावरकर गौरव यात्रेमुळं आगामी काळातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
(8 / 8)
महाविकास आघाडीची संभाजीनगरमधील ही पहिलीच वज्रमुठ सभा आहे. यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी मविआकडून सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळं आता विरोधकांची वज्रमुठ तर सत्ताधाऱ्यांची सावरकर गौरव यात्रेमुळं आगामी काळातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे.(Shiv Sena (UBT))

    शेअर करा