मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  loksabha election 2024: भाजप कडून मोदी. योगी, शहा तर कॉँग्रेसच्या राहुल अन् प्रियंकाकडून प्रचार सभांचा धडाका!

loksabha election 2024: भाजप कडून मोदी. योगी, शहा तर कॉँग्रेसच्या राहुल अन् प्रियंकाकडून प्रचार सभांचा धडाका!

Apr 16, 2024, 05:56 AMIST

loksabha election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचा ज्वर वाढत चालला आहे. विविध पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला आहे. भाजप कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरले आहे. तर कॉँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील सभांचा धडाका लावला आहे.

  • loksabha election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकांचा ज्वर वाढत चालला आहे. विविध पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडवण्यात आला आहे. भाजप कडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरले आहे. तर कॉँग्रेसचे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील सभांचा धडाका लावला आहे.
राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. विविध पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकित पराभवानंतर आता लोकसभेची जय्यत तयारी  काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून अलवर येथे निवडणूक रॅलीदरम्यान काँग्रेस नेत्या  प्रियंका गांधी वढेरा आणि अशोक गेहलोत.
(1 / 9)
राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. विविध पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. विधानसभा निवडणुकित पराभवानंतर आता लोकसभेची जय्यत तयारी  काँग्रेसने सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून अलवर येथे निवडणूक रॅलीदरम्यान काँग्रेस नेत्या  प्रियंका गांधी वढेरा आणि अशोक गेहलोत.(PTI)
पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अतिटतीची लढत पाहायला मिळत आहे. राज्यातून भाजपला हद्दपार करण्यासाठी  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सभांचा धडाका लावला आहे. रविवारी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे रॅलीदरम्यान संबोधित करतांना ममता बॅनर्जी. 
(2 / 9)
पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अतिटतीची लढत पाहायला मिळत आहे. राज्यातून भाजपला हद्दपार करण्यासाठी  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सभांचा धडाका लावला आहे. रविवारी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे रॅलीदरम्यान संबोधित करतांना ममता बॅनर्जी. (ANI)
भारतीय जनता पार्टी (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उत्तराखंडमधील मसुरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना.
(3 / 9)
भारतीय जनता पार्टी (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उत्तराखंडमधील मसुरी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना.(ANI)
भाजपला ३०० पारचा जादुई आकडा यावर्षी गाठायचा आहे. या साठी उत्तर परदेश हे महत्वाचे राज्य आहे. या ठिकाणी ७० हून अधिक लोकसभा मतदार संघ असून या ठिकाणी मोठा लीड भाजपला देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कंबर कसली असून प्रचार सभांचा धडाका लावला आहे.  या सोबतच इतर राज्यात देखील ते पक्षाचा प्रचार करत आहेत.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेसाठी हेलिकॉप्टरने  पोहोचले.
(4 / 9)
भाजपला ३०० पारचा जादुई आकडा यावर्षी गाठायचा आहे. या साठी उत्तर परदेश हे महत्वाचे राज्य आहे. या ठिकाणी ७० हून अधिक लोकसभा मतदार संघ असून या ठिकाणी मोठा लीड भाजपला देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कंबर कसली असून प्रचार सभांचा धडाका लावला आहे.  या सोबतच इतर राज्यात देखील ते पक्षाचा प्रचार करत आहेत.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बिहारच्या नवादा येथे जाहीर सभेसाठी हेलिकॉप्टरने  पोहोचले.(ANI)
बहुजन समाज पक्ष (BSP) प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पक्षाचे उमेदवार इरफान सैफी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत बोलत असतांना. ऐकएकाळी उत्तर प्रदेशात बाहून समाज पक्षाची सत्ता होती. गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी मायावती यांचा प्रयत्न सुरू आहे.  
(5 / 9)
बहुजन समाज पक्ष (BSP) प्रमुख मायावती, उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे पक्षाचे उमेदवार इरफान सैफी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत बोलत असतांना. ऐकएकाळी उत्तर प्रदेशात बाहून समाज पक्षाची सत्ता होती. गतवैभव पुन्हा मिळवण्यासाठी मायावती यांचा प्रयत्न सुरू आहे.  (ANI)
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाडमध्ये रोड शो आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांना ओवाळून प्रचाराची सुरुवात केली. 
(6 / 9)
काँग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील वायनाडमध्ये रोड शो आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या समर्थकांनी त्यांना ओवाळून प्रचाराची सुरुवात केली. (PTI)
केरळमधील पलक्कड येथील अलाथूर येथे पक्षाचे उमेदवार टीएन सरसू यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
(7 / 9)
केरळमधील पलक्कड येथील अलाथूर येथे पक्षाचे उमेदवार टीएन सरसू यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेत संबोधित करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी.(ANI)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मणिपूरमधील इंफाळ येथे एका जाहीर सभेत बोलतांना 
(8 / 9)
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मणिपूरमधील इंफाळ येथे एका जाहीर सभेत बोलतांना (PTI)
दक्षिण मालदा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ईशा खान चौधरी त्यांच्या प्रचारादरम्यान, मालदा, पश्चिम बंगाल येथे.
(9 / 9)
दक्षिण मालदा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ईशा खान चौधरी त्यांच्या प्रचारादरम्यान, मालदा, पश्चिम बंगाल येथे.(PTI)

    शेअर करा