मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Kylian Mbappe: कोण आहे फुटबॉलचा जादूगार किलियन एम्बाप्पे? २३व्या वर्षी होतेय मेस्सी-रोनाल्डोशी तुलना

Kylian Mbappe: कोण आहे फुटबॉलचा जादूगार किलियन एम्बाप्पे? २३व्या वर्षी होतेय मेस्सी-रोनाल्डोशी तुलना

Dec 15, 2022, 04:32 PMIST

Messi vs Mbappe, FIFA World Cup Final: किलियन एमबाप्पे या अवघ्या २३ वर्षांच्या फ्रेंच फुटबॉलरने खूपच कमी कालावधीत अविश्वसनीय ट्रॅक रेकॉर्ड बनवला आहे. एक खेळाडू म्हणून एमबाप्पेने अनेक पुरस्कार आणि विजेतेपद पटकावले आहेत. एमबाप्पे सध्या PSG क्लबकडून खेळतो. या क्लबमध्ये ब्राझीलचा नेमार ज्युनियर आणि अर्जेंटिनाचा लिओनेन मेस्सीसारखे स्टार खेळाडू आहेत. एमबाप्पे विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण फ्रेंच खेळाडू आहे. २०१८ च्या विश्वचषक फायनलमध्ये एमबाप्पेने गोल करुन पेलेची बरोबरी केली होती. पेले आणि एमबाप्पे हे दोघेच असे टीनएजर आहेत ज्यांनी विश्वचषकाच्या फायनलमध्ये गोल केले आहेत.

  • Messi vs Mbappe, FIFA World Cup Final: किलियन एमबाप्पे या अवघ्या २३ वर्षांच्या फ्रेंच फुटबॉलरने खूपच कमी कालावधीत अविश्वसनीय ट्रॅक रेकॉर्ड बनवला आहे. एक खेळाडू म्हणून एमबाप्पेने अनेक पुरस्कार आणि विजेतेपद पटकावले आहेत. एमबाप्पे सध्या PSG क्लबकडून खेळतो. या क्लबमध्ये ब्राझीलचा नेमार ज्युनियर आणि अर्जेंटिनाचा लिओनेन मेस्सीसारखे स्टार खेळाडू आहेत. एमबाप्पे विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण फ्रेंच खेळाडू आहे. २०१८ च्या विश्वचषक फायनलमध्ये एमबाप्पेने गोल करुन पेलेची बरोबरी केली होती. पेले आणि एमबाप्पे हे दोघेच असे टीनएजर आहेत ज्यांनी विश्वचषकाच्या फायनलमध्ये गोल केले आहेत.
एमबाप्पे सध्या जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. तो इतक्या वेगाने चेंडूवर झेपावतो की जगभरातील बचावपटूंना त्याला रोखणे कठीण होते. या वर्ल्डकपमध्ये तो सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तो आणि मेस्सी गोल्डन बुटच्या शर्यतीत आहेत. दोघांच्या नावावर ५ गोल आहेत.
(1 / 10)

यादरम्यान त्याने ब्राझीलचा माजी कर्णधार पेलेचा विक्रमही मोडला. एम्बाप्पे वयाच्या २४ व्या वर्षी फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे. यादरम्यान त्याने डिएगो मॅराडोना आणि पेलेसारख्या महान खेळाडूंना मागे टाकले. 
(2 / 10)

विश्वचषकातील त्याच्या रेकॉर्डसबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा हा दुसरा वर्ल्डकप आहे. त्याने आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये १३ सामने खेळले आहेत. या १३ सामन्यात त्याच्या नावावर ९ गोल आहेत. गेल्या विश्वचषकात म्हणजेच २०१८ मध्ये त्याने ४ गोल केले होते.
(3 / 10)

यासोबतच त्याने लियोनेल मेस्सी आणि रोनाल्डोच्या क्लबमध्येदेखील एन्ट्री केली आहे. एम्बाप्पेचे १३ सामन्यात ९ गोल आहेत. तर मेस्सीचे वर्ल्डकपमधील २५ सामन्यांमध्ये ११ गोल आहेत. तर रोनाल्डोने वर्ल्डकपचे आतापर्यंत २१ सामने खेळले आहेत. यात त्याने ९ गोल केले आहेत.
(4 / 10)

२०१८ चा वर्ल्डकप एम्बाप्पेचा पहिला वर्ल्डकप होता. तो २०१८ मध्ये केवळ १९ वर्षांचा होता. त्याने त्या वर्ल्डकपमध्ये एकूण ४ गोल केले होते. त्याने या वर्ल्डकपच्या फायनलमध्येही गोल केला होता. त्यानंतर तो वर्ल्डकप फायनलमध्ये गोल करणाऱ्या सर्वात तरूण खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. या बाबतीत ब्राझीलचा पेले क्रमांक एकवर आहे. त्याने वयाच्या १७ व्या वर्षी  वर्ल्डकप फायनलमध्ये गोल केला होता. पेलेने १९५८ मध्ये स्वीडनविरुद्ध तर एम्बाप्पेने क्रोएशियाविरुद्ध हा पराक्रम केला.
(5 / 10)

Kylian Mbappé चा जन्म पॅरिसपासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंडी उपनगरात झाला. त्याने वयाच्या १४व्या वर्षी मोनॅको क्लबकडून खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एम्बाप्पेची आई हँडबॉल खेळाडू आहे तर त्याचे वडील फुटबॉलपटू आहेत.
(6 / 10)

कायलियन एमबाप्पे जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये गणले जाते. २०१९ मध्ये २३.६१ किलोमीटर प्रतितास या वेगाने धावून त्याने बरीच चर्चा मिळवली होती.
(7 / 10)

कमाईच्या बाबतीतही एमबाप्पे जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. तो फुटबॉलच्या माध्यमातून वर्षाला ९ अब्ज रुपये कमावतो, तर त्याला जाहिराती इत्यादींमधून सुमारे २ अब्ज रुपये मिळतात. 
(8 / 10)

एमबाप्पे हा सध्या फुटबॉल जगतातील सर्वात मौल्यवान खेळाडू आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू १२७० कोटी रुपये आहे. २०१७ मध्ये फ्रान्ससाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या एम्बाप्पेने ६३ सामन्यांमध्ये ३२ गोल केले आहेत. तो २०१७ पासून पीएसजीकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत २२१ सामन्यात १७६ गोल केले आहेत. पीएसजीने एम्बाप्पेला मोनॅको फुटबॉल क्लबकडून सुमारे १४०० कोटी रुपयांना विकत घेतले होते. 
(9 / 10)

Messi vs Mbappe, FIFA World Cup Final
(10 / 10)
Messi vs Mbappe, FIFA World Cup Final(all photos- Kylian Mbappe instagram)

    शेअर करा