मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tea Adulteration Testing: तुम्ही विकत घेत असलेल्या चहापत्तीत भेसळ तर नाही ना? अशा प्रकारे तपासा

Tea Adulteration Testing: तुम्ही विकत घेत असलेल्या चहापत्तीत भेसळ तर नाही ना? अशा प्रकारे तपासा

Apr 22, 2024, 06:55 PMIST

Tea Adulteration Testing: तुम्ही बाजारातून विकत घेत असलेल्या चहापत्तीमध्ये भेसळ तर नाही ना? हे कसे तपासावे, याची टेस्ट कशी करावी? जाणून घ्या.

  • Tea Adulteration Testing: तुम्ही बाजारातून विकत घेत असलेल्या चहापत्तीमध्ये भेसळ तर नाही ना? हे कसे तपासावे, याची टेस्ट कशी करावी? जाणून घ्या.
चहा हा रोजचा सोबती आहे. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा प्यायल्याशिवाय होत नाही. केवळ सवयीमुळेच नाही तर चहाचा शरीराला विविध प्रकारे फायदा होतो. परिणामी लोक बराच वेळ चहा पितात.
(1 / 7)

पण काळाबरोबर बाजार बदलला आहे. आता अनेक जण जादा नफ्यासाठी चहापत्तीमध्ये भेसळ करतात. या प्रकारचा चहा फायदेशीर तर नाही पण यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. भेसळयुक्त चहा कसा ओळखावा? 
(2 / 7)

लक्षात ठेवा, पॅकेज्ड चहापत्ती असोत किंवा खुली चहापत्ती असो - भेसळ कोणत्याही गोष्टीत असू शकते. ही भेसळ ओळखण्याचा मार्ग काय? अस्सल चहा कसा ओळखाल? या चहामध्ये कोणतेही रसायन कसे मिसळले जाते? सर्व उत्तरे येथे आहेत.
(3 / 7)

चहापत्तीमध्ये भेसळ आहे की नाही हे ओळखण्यासाठी सर्वप्रथम टिश्यू पेपरवर २ चमचे चहापत्ती ठेवावीत. त्यानंतर चहापत्तीवर पाण्याचे काही थेंब टाकून थोडा वेळ उन्हात ठेवावे. नंतर टिश्यू पेपरवरून चहापत्ती काढून टाका. चहापत्तीमध्ये भेसळ केल्यास टिश्यू पेपरवर डाग दिसतील. डाग किंवा खुणा नसतील तर चहापत्तीत भेसळ नाही. 
(4 / 7)

पुढचा मार्ग म्हणजे एक ग्लास थंड पाण्यात १-२ चमचे चहापत्ती टाकून १ मिनिट तसेच राहू द्या. थोडा वेळाने पाण्याचा बदलला तर तुम्हाला कळेल की चहापत्तीत भेसळ आहे. खऱ्या चहापत्तीचा रंग इतक्या लवकर बाहेर येत नाही. 
(5 / 7)

चहापत्तीमध्ये रसायने आहेत की नाही हे तपासण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे चहापत्ती आपल्या हातात १-२ मिनिटे चोळावे. तुमच्या हातात काही रंग दिसला तर तुमच्या लक्षात येईल की चहापत्तीत काही रसायनं मिसळली आहेत.
(6 / 7)

चहापत्तीची चाचणी कशी करावी हे माहित असलेल्या तज्ञांचा सल्ला देखील आपण घेऊ शकता. ते तुम्हाला मॅन्युअली तपासणी करून भेसळ ओळखण्याचा मार्ग सांगतिल. लक्षात ठेवा शुद्ध चहापत्तीपासून बनवलेले पेय शरीराला फायदेशीर ठरते. तसेच भेसळीमुळे विविध धोके येतात. त्यामुळे आता सावध व्हा. 
(7 / 7)

    शेअर करा