मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Photo : देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी केली विठुराया आणि रखुमाईची पूजा

Photo : देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी केली विठुराया आणि रखुमाईची पूजा

Nov 23, 2023, 04:56 PMIST

Kartiki Ekadashi Pooja - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी आज कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात जाऊन विठुराया आणि रखुमाईची पूजा केली.

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे श्री विठुराया आणि रखुमाईची शासकीय पूजा केली. परंपरेप्रमाणे पंढरपुरात आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची प्रथा आहे.
(1 / 4)

पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर व संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ७३ कोटी मंजूर झाले असून पहिल्या टप्प्यातील २६ कोटींच्या कामांचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.
(2 / 4)

पंढरपूर येथे आज कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नाशिक येथील बबन विठोबा घुगे व सौ. वत्सला घुगे या वारकरी दांपत्याला पुजेचा मान मिळाला होता. 
(3 / 4)

​​उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांचे कुलदैवत श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान, नीरा-नरसिंहपूर येथे जाऊन सपत्नीक श्री लक्ष्मी नृसिंहाचे दर्शन घेऊन अभिषेक केले.
(4 / 4)

    शेअर करा