मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Julian Alvarez: अल्वारेझच्या गर्लफ्रेंडनं हे बरोबर केलं नाही, २० हजार मुलींनी सांगितलं ब्रेकअप कर!

Julian Alvarez: अल्वारेझच्या गर्लफ्रेंडनं हे बरोबर केलं नाही, २० हजार मुलींनी सांगितलं ब्रेकअप कर!

Jan 03, 2023, 04:00 PMIST

Julian Alvarez Girlfriend Emilia Ferrero breakup petition: अर्जेंटिनाचा युवा फुटबॉलपटू ज्युलियन अल्वारेझला २०२२ च्या विश्वचषकाने सुपरस्टार बनवले. सेमी फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध केलेला गोल आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि कायम राहील. मात्र, आता अल्वारेझ एका विचित्र कारणासाठी चर्चेत आला आहे. ज्युलियन अल्वारेझने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेक अप करावा, यासाठी अनेक तरुणींनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २० हजारांहून अधिक तरुणींनी ब्रेकअपच्या समर्थनार्थ सह्या केल्या आहेत.

  • Julian Alvarez Girlfriend Emilia Ferrero breakup petition: अर्जेंटिनाचा युवा फुटबॉलपटू ज्युलियन अल्वारेझला २०२२ च्या विश्वचषकाने सुपरस्टार बनवले. सेमी फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध केलेला गोल आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि कायम राहील. मात्र, आता अल्वारेझ एका विचित्र कारणासाठी चर्चेत आला आहे. ज्युलियन अल्वारेझने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत ब्रेक अप करावा, यासाठी अनेक तरुणींनी ऑनलाईन याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २० हजारांहून अधिक तरुणींनी ब्रेकअपच्या समर्थनार्थ सह्या केल्या आहेत.
अर्जेंटिनाचा संघ गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये फिफा विश्वचषक २०२२ चे विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला. फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. या विजयासह लिओनेल मेस्सीचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही पूर्ण झाले.
(1 / 10)

अर्जेंटिना संघाच्या शानदार कामगिरीत फॉरवर्ड खेळाडू ज्युलियन अल्वारेझने महत्त्वाची भूमिका बजावली. आता तोच अल्वारेझ एका विचित्र संकटात सापडला आहे.  खरे तर ज्युलियन अल्वारेझने त्याच्या गर्लफ्रेंडपासून वेगळे व्हावे, यासाठी अनेक तरूणींनी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.
(2 / 10)

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे या याचिकेवर २० हजारांहून अधिक तरुणींनी सह्या केल्या आहेत. याचिका दाखल करण्याचे कारण अल्वारेझची मैत्रीण अमेलिया फेरेरो आहे.
(3 / 10)

 खरंतर ख्रिसमसच्या वेळी चाहत्यांना अल्वारेझसोबत एक-एक फोटो क्लिक करायचे होते. मात्र, तेवढ्यात फरेरा पुढे आली आणि तिने अल्वारेझला चाहत्यांसोबत एकच ग्रुप फोटो काढण्यास सांगितले जेणेकरून उशीर होणार नाही.
(4 / 10)

यामुळे चाहते चांगलेच संतापले. त्यांनी या संतापाच्या भरातच ऑनलाइन याचिका दाखल करुन त्यावर हजारो सह्या घेतल्या.
(5 / 10)

 मात्र, ज्युलियन अल्वारेझने ब्रेकअपचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. दोघांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर न्यू इयर सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला आहे. अल्वारेझ आणि फेरेरो हे अर्जेंटिनातील एकाच शहरातील आहेत आणि २०१७ पासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
(6 / 10)

फेरेरो ही हेल्थ एक्सपर्ट तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती हॉकीपटूही राहिली आहे. अमेलिया फेरेरो विश्वचषकादरम्यान ज्युलियन अल्वारेझसोबत कतारमध्येच होती. त्यावेळी तिने एका पोस्टमध्ये लिहिले होते की, 'तु कुठेही राहा, मी तुझ्या सोबत येईन. मी आयुष्यभर तुला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करेन.
(7 / 10)

२२ वर्षीय ज्युलियन अल्वारेझने कतारमध्ये झालेल्या विश्वचषकादरम्यान ७ सामन्यांमध्ये एकूण ४ गोल केले. तो गोल्डन बूटच्या शर्यतीतही सामील होता. अल्वारेझने उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियाविरुद्ध केलेला गोल आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे आणि कायम राहील.
(8 / 10)

ज्युलियन अल्वारेझ गेल्या वर्षाच्या सुरुवातीला मँचेस्टर सिटीशी जोडला गेला होता. त्याला एर्लिंग हॅलँडचा बॅकअप म्हणून साइन करण्यात आले होते. अशा परिस्थितीत अल्वारेझला ज्या काही संधी मिळाल्या, त्याद्वारे त्याने सर्वांना प्रभावित केले. पण २०२२ च्या विश्वचषकाने त्याला सुपरस्टार बनवले. 
(9 / 10)

Julian Alvarez Girlfriend Emilia Ferrero
(10 / 10)
Julian Alvarez Girlfriend Emilia Ferrero(all photos- Julian Alvarez & Emilia Ferrero instagram)

    शेअर करा