मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Jejuri Mardani Dasara : सोन्याच्या जेजुरीत तब्बल १८ तास रंगला मर्दानी दसरा! पाहा फोटो

Jejuri Mardani Dasara : सोन्याच्या जेजुरीत तब्बल १८ तास रंगला मर्दानी दसरा! पाहा फोटो

Oct 06, 2022, 09:52 PMIST

Jejuri Mardani Dasara : जेजुरी गडावर काल बापासून सुरू झालेला मर्दानी दसरा सोहळा तब्बल १८ तास रंगाला. या सोहळ्यात हजारो भाविक भक्त, ग्रामस्थांना वेगळीच अनुभूती देऊन गेला. यावेळी उपस्थित भाविकांनी मुक्त हस्ते भंडा-याची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्णनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गुरुवारी (दि ६) ऐतिहासिक खंडा स्पर्धेने सोहळ्याची सांगता झाली.

  • Jejuri Mardani Dasara : जेजुरी गडावर काल बापासून सुरू झालेला मर्दानी दसरा सोहळा तब्बल १८ तास रंगाला. या सोहळ्यात हजारो भाविक भक्त, ग्रामस्थांना वेगळीच अनुभूती देऊन गेला. यावेळी उपस्थित भाविकांनी मुक्त हस्ते भंडा-याची उधळण केल्याने मावळतीला गडकोटाला सुवर्णनगरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. गुरुवारी (दि ६) ऐतिहासिक खंडा स्पर्धेने सोहळ्याची सांगता झाली.
नवरात्र उत्सवाची सांगता आणि घराघरातील घट उठवणे, तळीभंडार-शस्त्रपूजन झाल्यानंतर जेजुरीकर ग्रामस्थ, मानकरी, पुजारी सेवेकरी, खांदेकरी तसेच सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी जेजुरीचा गड व परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. आज झालेल्या खंडा स्पर्धेत तब्बल ५८ किलोचा खंडा एका हाताने उचलून त्याच्या कसरती सादर केल्या. या स्पर्धेने उवस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. (छायाचित: हिंदुस्तान टाईम्स मराठी)
(1 / 6)

एका हातात खंडा (तलवार) तोलून धरणे या स्पर्धेमध्ये ३५युवकांनी सहभाग घेतला. तरुणांनी हा खंडा लिलया एका हाताने उचलून कसरती सादर केल्या. (छायाचित्र : हिंदुस्थान टाइम्स मराठी)
(2 / 6)

या वर्षी या स्पर्धेत प्रथम क्रमांक अमोल खोमणे याने पटकावला. तर द्वितीय क्रमांक हा मंगेश चव्हाण याने पटकाविला, तृतीय क्रमांक हा हेमंत माने याने तर ,उत्तेजनार्थ पारितोषिकाचे मानकरी  बाबा माने, विजय कामथे हे ठरले. (छायाचित्र : हिंदुस्तान टाईम्स मराठी)  
(3 / 6)

तर चित्तथरारक खंडा (तलवार) कसरतीमध्ये प्रथम क्रमांक सचिन कुदळे, द्वितीय क्रमांक हा-शिवाजी राणे, तृतीय क्रमांक हा नितीन कुदळे यांनी पटकावला. तर ,उत्तेजनार्थ क्रमांक हा अक्षय गोडसे, विशाल माने, सौरभ सकट यांनी पटकावला. (छायाचित्र : हिंदुस्थान टाईम्स मराठी) 
(4 / 6)

या सोहळ्यामध्ये मानकरी ग्रामस्थ, खांदेकरी यांचा सन्मान करण्यात आला.  लोककलावंताना मानधन देण्यात आले, "रोजमुरा" वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली, धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन देवसंस्थान कर्मचारी, अधिकारी व पुजारी, सेवेकरी यांनी केले होते. (छायाचित्र : हिंदुस्थान टाईम्स मराठी)
(5 / 6)

स्पर्धेत परीक्षक पंच म्हणून प्रा.सोमनाथ उबाळे, पै कृष्णा कुदळे, माजी विश्वस्त-सुधीर गोडसे यांनी काम पाहिले. तर  प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडेपाटील, डॉ. राजकुमार लोढा,  प्रसाद शिंदे, संदीप जगताप, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप,  सतीश घाडगे यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. (छायाचित्र : हिंदुस्थान टाईम्स मराठी)
(6 / 6)

    शेअर करा