मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Israel-Hamas War: गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम; ५० इस्त्रायली ओलिसांना सोडण्यास हमास तयार

Israel-Hamas War: गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम; ५० इस्त्रायली ओलिसांना सोडण्यास हमास तयार

Nov 24, 2023, 01:12 PMIST

Israel-Hamas War - इस्त्रायल आणि हमासदरम्यान गाझा पट्टीत सुरु असलेलं युद्ध चार दिवस थांबविण्याबाबत दोन्ही पक्षांत समझोता झाला आहे. आज, शुक्रवारपासून पुढील चार दिवस युद्ध थांबवण्यात येणार असून यादरम्यान इस्त्रायल आणि हमास त्यांच्याकडे असलेल्या ओलिसांची सुटका करणार आहे.

Israel-Hamas War - इस्त्रायल आणि हमासदरम्यान गाझा पट्टीत सुरु असलेलं युद्ध चार दिवस थांबविण्याबाबत दोन्ही पक्षांत समझोता झाला आहे. आज, शुक्रवारपासून पुढील चार दिवस युद्ध थांबवण्यात येणार असून यादरम्यान इस्त्रायल आणि हमास त्यांच्याकडे असलेल्या ओलिसांची सुटका करणार आहे.
पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीत ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेलं युद्ध काही काळ थांबण्याची चिन्ह दिसत आहेत. इस्त्रायल आणि हमासच्या प्रतिनिधींमध्ये चार दिवस युद्धविराम करण्याच्या करार झाला आहे. या करारामध्ये कतर आणि इजिप्तने मध्यस्थी केली होती. 
(1 / 5)
पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीत ७ ऑक्टोबरपासून सुरू असलेलं युद्ध काही काळ थांबण्याची चिन्ह दिसत आहेत. इस्त्रायल आणि हमासच्या प्रतिनिधींमध्ये चार दिवस युद्धविराम करण्याच्या करार झाला आहे. या करारामध्ये कतर आणि इजिप्तने मध्यस्थी केली होती. (REUTERS)
या चार दिवसांच्या युद्धविरामदरम्यान हमास टप्याटप्यात ५० इस्त्रायली ओलिसांची सुटका करणार आहे. याबदल्यात इस्त्रायलच्या कारागृहात बंद असलेले १५० नागरिकांची इस्त्रायल सरकारकडून सुटका करण्यात येईल. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर २०० इस्त्रायली नागरिकांना पकडून ओलिस ठेवले आहेत.
(2 / 5)
या चार दिवसांच्या युद्धविरामदरम्यान हमास टप्याटप्यात ५० इस्त्रायली ओलिसांची सुटका करणार आहे. याबदल्यात इस्त्रायलच्या कारागृहात बंद असलेले १५० नागरिकांची इस्त्रायल सरकारकडून सुटका करण्यात येईल. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर २०० इस्त्रायली नागरिकांना पकडून ओलिस ठेवले आहेत.(REUTERS)
‘हमास’ने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर २४० इस्त्रायली नागरिकांना पकडून ओलिस ठेवले आहे. या नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्त्रायलच्या लष्कराने गाझामध्ये हमासच्या अनेक छुप्या ठिकाणांवर छापे टाकून बॉम्बहल्ले केले होते. परंतु इस्त्रायली लष्कराला ओलिसांची सुटका करण्यात यश आले नव्हते. 
(3 / 5)
‘हमास’ने ७ ऑक्टोबर रोजी इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर २४० इस्त्रायली नागरिकांना पकडून ओलिस ठेवले आहे. या नागरिकांची सुटका करण्यासाठी इस्त्रायलच्या लष्कराने गाझामध्ये हमासच्या अनेक छुप्या ठिकाणांवर छापे टाकून बॉम्बहल्ले केले होते. परंतु इस्त्रायली लष्कराला ओलिसांची सुटका करण्यात यश आले नव्हते. (REUTERS)
ओलिसांच्या सुटकेच्या पहिल्या टप्यात हमासकडून १३ इस्त्रायली ओलिस महिला आणि एक लहान मुला सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कतरच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते माजिद अल अंसारी यांनी दिली. हमासकडून सोडण्यात आलेल्या इस्रायली ओलिसांना प्रथम रेड क्रॉस संघटनेकडे सोपवण्यात येईल. तेथून ते इस्त्रायल सरकारकडे सोपविले जातील.
(4 / 5)
ओलिसांच्या सुटकेच्या पहिल्या टप्यात हमासकडून १३ इस्त्रायली ओलिस महिला आणि एक लहान मुला सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कतरच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते माजिद अल अंसारी यांनी दिली. हमासकडून सोडण्यात आलेल्या इस्रायली ओलिसांना प्रथम रेड क्रॉस संघटनेकडे सोपवण्यात येईल. तेथून ते इस्त्रायल सरकारकडे सोपविले जातील.(REUTERS)
हमास आणि इस्त्रायलकडून सर्वप्रथम महिला आणि लहान मुलांची सुटका करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रत्येक दहा ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात  एक अतिरिक्त दिवस युद्धविराम वाढविण्यात येईल, असं इस्त्रायलकडून सांगण्यात आलं आहे.
(5 / 5)
हमास आणि इस्त्रायलकडून सर्वप्रथम महिला आणि लहान मुलांची सुटका करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रत्येक दहा ओलिसांच्या सुटकेच्या बदल्यात  एक अतिरिक्त दिवस युद्धविराम वाढविण्यात येईल, असं इस्त्रायलकडून सांगण्यात आलं आहे.(AP)

    शेअर करा