मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2024 Points Table : गुणतालिकेत केकेआर-सीएसकेची मोठी झेप, राजस्थानला धक्का, नंबर वन कोण? पाहा

IPL 2024 Points Table : गुणतालिकेत केकेआर-सीएसकेची मोठी झेप, राजस्थानला धक्का, नंबर वन कोण? पाहा

May 06, 2024, 03:38 PMIST

IPL 2024 points table : आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (५ मे) दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात सीएसकेने पंजाबचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात केकेआरने लखनौचा धुव्वा उडवला. या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. केकेआर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

  • IPL 2024 points table : आयपीएल २०२४ मध्ये रविवारी (५ मे) दोन सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात सीएसकेने पंजाबचा पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात केकेआरने लखनौचा धुव्वा उडवला. या सामन्यानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. केकेआर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला आहे.
केकेआरने रविवारी लखनौ सुपर जायंट्सचा ९८ धावांनी पराभव केला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कोलकाताने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांनी तीन सामने गमवावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा नेट रन रेट +१.४५३ आहे.
(1 / 10)
केकेआरने रविवारी लखनौ सुपर जायंट्सचा ९८ धावांनी पराभव केला. या विजयासह कोलकाताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. कोलकाताने ११ पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांनी तीन सामने गमवावे लागले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाचा नेट रन रेट +१.४५३ आहे.(PTI)
यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांनी १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांनी २ सामने गमवावे लागले आहेत. संजू सॅमसनचा संघ सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. नेट रनरेटमध्ये ते केकेआरपेक्षा मागे आहेत. राजस्थानचा नेट रन रेट +०.६२२ आहे.
(2 / 10)
यानंतर राजस्थान रॉयल्स दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. त्यांनी १० पैकी ८ सामने जिंकले आहेत. त्यांनी २ सामने गमवावे लागले आहेत. संजू सॅमसनचा संघ सध्या १६ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. नेट रनरेटमध्ये ते केकेआरपेक्षा मागे आहेत. राजस्थानचा नेट रन रेट +०.६२२ आहे.(ANI)
चेन्नई सुपर किंग्जने रविवारी पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सीएसकेने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांनी ५ सामने गमावले आहेत. आता त्यांचे १२ गुण झाले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या संघाचा नेट रन रेट ०.७०० आहे.
(3 / 10)
चेन्नई सुपर किंग्जने रविवारी पंजाब किंग्जला पराभूत करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. सीएसकेने ११ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यांनी ५ सामने गमावले आहेत. आता त्यांचे १२ गुण झाले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या संघाचा नेट रन रेट ०.७०० आहे.(ANI)
सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने १० पैकी ६ सामने जिंकले आहेत तर ४ सामने गमावले आहेत. तसेच त्यांचे १२ गुण आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत मात्र ते थोडे मागे आहेत. हैदराबादचा नेट रन रेट +०.०७२ आहे.
(4 / 10)
सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने १० पैकी ६ सामने जिंकले आहेत तर ४ सामने गमावले आहेत. तसेच त्यांचे १२ गुण आहेत. नेट रनरेटच्या बाबतीत मात्र ते थोडे मागे आहेत. हैदराबादचा नेट रन रेट +०.०७२ आहे.( AFP)
लखनौ सुपर जायंट्सला रविवारी केकेआरकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे ११ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत. त्यांनी ६ सामने जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. लखनौचा नेट रन रेट -०.३७१ आहे.
(5 / 10)
लखनौ सुपर जायंट्सला रविवारी केकेआरकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाचे ११ सामन्यांतून १२ गुण झाले आहेत. त्यांनी ६ सामने जिंकले आहेत आणि पाच गमावले आहेत. लखनौचा नेट रन रेट -०.३७१ आहे.(PTI)
दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी ११ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यांनी ६ सामने गमावले आहेत. दिल्लीचे १० गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट -०.४४२ आहे.
(6 / 10)
दिल्ली कॅपिटल्स सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी ११ पैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यांनी ६ सामने गमावले आहेत. दिल्लीचे १० गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट -०.४४२ आहे.(PTI)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभूत करत सातव्या स्थानावर झेप घेतली. त्यांनी ११ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यांनी ७ सामने गमावले आहेत. आता त्यांचे ८ गुण झाले आहेत. फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीचा नेट रन रेट -०.०४९ आहे.
(7 / 10)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात टायटन्सला पराभूत करत सातव्या स्थानावर झेप घेतली. त्यांनी ११ पैकी ४ सामने जिंकले आहेत. त्यांनी ७ सामने गमावले आहेत. आता त्यांचे ८ गुण झाले आहेत. फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीचा नेट रन रेट -०.०४९ आहे.(PTI)
पंजाब किंग्ज गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. पंजाबने ११ सामने खेळले आहेत. त्यांनी ४ सामने जिंकले आहेत तर उर्वरित ७ सामने गमावले आहेत. त्यांचे ८ गुण आहेत. नेट रनरेटमध्ये पंजाब पिछाडीवर आहे. त्यांचा नेट रन रेट -०.१८७ आहे.
(8 / 10)
पंजाब किंग्ज गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे. पंजाबने ११ सामने खेळले आहेत. त्यांनी ४ सामने जिंकले आहेत तर उर्वरित ७ सामने गमावले आहेत. त्यांचे ८ गुण आहेत. नेट रनरेटमध्ये पंजाब पिछाडीवर आहे. त्यांचा नेट रन रेट -०.१८७ आहे.(AFP)
गुजरात टायटन्स नवव्या स्थानावर आहे. त्यांचे ११ सामान्य ८ गुण आहेत. गुजरातने ४ सामने जिंकले आहेत आणि ७7 हरले आहेत. गुजरातचा नेट रनरेट -१.३२० आहे.
(9 / 10)
गुजरात टायटन्स नवव्या स्थानावर आहे. त्यांचे ११ सामान्य ८ गुण आहेत. गुजरातने ४ सामने जिंकले आहेत आणि ७7 हरले आहेत. गुजरातचा नेट रनरेट -१.३२० आहे.(ANI)
गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात खराब आहे. मुंबईने ११ पैकी ८ सामने गमावले आहेत. त्यांना केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. आता हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सर्वात खाली आहे.
(10 / 10)
गुणतालिकेत मुंबई इंडियन्सचा संघ सर्वात खराब आहे. मुंबईने ११ पैकी ८ सामने गमावले आहेत. त्यांना केवळ ३ सामने जिंकता आले आहेत. आता हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सर्वात खाली आहे.(PTI)

    शेअर करा