मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IPL 2022: बटलरच्या 'ऑरेंज कॅप'ला धोका, राहुल-डिकॉकची मजबूत दावेदारी, पाहा यादी

IPL 2022: बटलरच्या 'ऑरेंज कॅप'ला धोका, राहुल-डिकॉकची मजबूत दावेदारी, पाहा यादी

May 20, 2022, 04:44 PMIST

आयपीएलच्या ऑरेंज कॅप यादीत पहिल्यापासून राजस्थानचा फलंदाज जोस बटलरने पहिले स्थान कायम राखले होते. मात्र त्याच्या स्थानाला आता लखनौच्या सलामीवीरांकडून आव्हान दिले जात आहे. बटलरला गेल्या काही सामन्यांमध्ये धावा करता आल्या नाहीत. त्याच्यासमोर धावांचे अंतर वाढवण्याचे आव्हान असेल. 

  • आयपीएलच्या ऑरेंज कॅप यादीत पहिल्यापासून राजस्थानचा फलंदाज जोस बटलरने पहिले स्थान कायम राखले होते. मात्र त्याच्या स्थानाला आता लखनौच्या सलामीवीरांकडून आव्हान दिले जात आहे. बटलरला गेल्या काही सामन्यांमध्ये धावा करता आल्या नाहीत. त्याच्यासमोर धावांचे अंतर वाढवण्याचे आव्हान असेल. 
ऑरेंज कॅप यादीत जोस बटलर अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. बटलरने १३ सामन्यात एकूण ६२८ धावा केल्या आहेत. त्याच्या सर्वोच्च धावा ११८ आहेत. तसेच त्याने यंदाच्या हंगामात शतकांची हॅट्टिक केली आहे. 
(1 / 5)

लखनौ सुपर जायंट्सचे दोन सलामीवीरांनी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात द्विशतकी भागीदारी करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत मजबूत दावेदारी सादर केली आहे. लखनौचा कर्णधार केएल राहुलने ५१ चेंडूत नाबाद ६८ धावा केल्या. त्‍यामुळे त्याच्या १४ मॅचमध्‍ये ५३६ धावा झाल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या यादीत राहुलने दुसरे स्थान पटकावले आहे.
(2 / 5)

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात क्विंटन डी'कॉकची कामगिरी अतिशय प्रभावी होती.   त्याच्या एका खेळीने तो सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर आला आहे. KKR विरुद्ध डिकॉकने ६० चेंडूत नाबाद १४० धावांची अविस्मरणीय खेळी केली. IPL इतिहासातील ही तिसरी सर्वोत्तम खेळी आहे. आयपीएलच्या १४ सामन्यांमध्ये त्याच्या एकूण ५०२ धावा झाल्या आहेत. त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १४० आहे.  
(3 / 5)

गुजरात टायटन्सविरुद्ध ३६ चेंडूत ४४ धावा करून फाफ डुप्लेसिसने ऑरेंज कॅपच्या पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. त्याने १४ सामन्यांत एकूण ४४३ धावा केल्या आहेत. तो पहिल्या तीन फलंदाजांच्या खूपच मागे आहे. त्याच्या सर्वाधिक धावा ९७ आहेत.
(4 / 5)

दिल्लीचा आक्रमक सलामीवार डेव्हिड वॉर्नर या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने १० सामन्यात एकूण ४२८ धावा केल्या आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद ९२ आहे. 
(5 / 5)

    शेअर करा