मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gandhi Jayanti 2022: महात्मा गांधीजींबद्दल तुम्हाला कदाचित माहित नसलेली मनोरंजक तथ्य

Gandhi Jayanti 2022: महात्मा गांधीजींबद्दल तुम्हाला कदाचित माहित नसलेली मनोरंजक तथ्य

Oct 02, 2022, 12:03 PMIST

Interesting Facts About Mahatma Gandhi : महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला जो आजच्या काळात गुजरात म्हणून ओळखला जातो. यंदा त्यांची १५३ वी जयंती आहे.

Interesting Facts About Mahatma Gandhi : महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी पोरबंदर येथे झाला जो आजच्या काळात गुजरात म्हणून ओळखला जातो. यंदा त्यांची १५३ वी जयंती आहे.
महात्मा ("महान आत्मा") गांधी म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी देशभरात गांधी जयंती साजरी केली जाते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञानात मोठे योगदान असलेल्या दिग्गज नेत्याबद्दल काही कमी ज्ञात तथ्ये येथे आहेत.
(1 / 9)
महात्मा ("महान आत्मा") गांधी म्हणून ओळखले जाणारे मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी देशभरात गांधी जयंती साजरी केली जाते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि त्यांच्या जीवनातील तत्त्वज्ञानात मोठे योगदान असलेल्या दिग्गज नेत्याबद्दल काही कमी ज्ञात तथ्ये येथे आहेत.(Twitter/@VPSecretariat)
महात्मा गांधींना १९३० मध्ये टाईम मॅगझिन मॅन ऑफ द इयर ही पदवी मिळाली. या पदवीने सन्मानित झालेले ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत.
(2 / 9)
महात्मा गांधींना १९३० मध्ये टाईम मॅगझिन मॅन ऑफ द इयर ही पदवी मिळाली. या पदवीने सन्मानित झालेले ते पहिले आणि एकमेव भारतीय आहेत.(File Image (Getty Images))
महात्मा गांधी इंग्रजी बोलताना कायम आयरिश स्वरात बोलत असत. कारण त्यांचे पहिले शिक्षक आयरिश होते.
(3 / 9)
महात्मा गांधी इंग्रजी बोलताना कायम आयरिश स्वरात बोलत असत. कारण त्यांचे पहिले शिक्षक आयरिश होते.(PTI)
महात्मा गांधींना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळाले होते पण त्यांना कधीही हा पुरस्कार मिळाला नाही.
(4 / 9)
महात्मा गांधींना शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकन मिळाले होते पण त्यांना कधीही हा पुरस्कार मिळाला नाही.(Wikimedia Commons)
महान बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना 'महात्मा' ही पदवी दिली होती.
(5 / 9)
महान बंगाली कवी रवींद्रनाथ टागोर यांनी गांधींना 'महात्मा' ही पदवी दिली होती.(File Photo)
१९०४ मध्ये जन्मलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबत महात्मा गांधी यांचा वाढदिवस आहे.
(6 / 9)
१९०४ मध्ये जन्मलेल्या लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबत महात्मा गांधी यांचा वाढदिवस आहे.(File Photo (Getty Images))
महात्मा गांधींच्या अंत्ययात्रेला ८ किमी लांब रांग लागली होती. हजारो लोकं त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायला रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. तर लाखो लोकं त्यांच्या अंत्ययात्रेत प्रत्यक्ष सहभागी झाली होती.
(7 / 9)
महात्मा गांधींच्या अंत्ययात्रेला ८ किमी लांब रांग लागली होती. हजारो लोकं त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायला रस्त्याच्या दुतर्फा उभी होती. तर लाखो लोकं त्यांच्या अंत्ययात्रेत प्रत्यक्ष सहभागी झाली होती.(File Photo)
भारताबाहेरील 48 आणि देशातील 53 रस्त्यांना महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं आहे. एखाद्या नेत्याचा हा असा सन्मान वाट्याला येणाऱ्या जगातल्या सर्वात थोर व्यक्तींमध्ये म्हणूनच गांधीजींचं नाव आदराने घेतलं जातं.
(8 / 9)
भारताबाहेरील 48 आणि देशातील 53 रस्त्यांना महात्मा गांधींचं नाव देण्यात आलं आहे. एखाद्या नेत्याचा हा असा सन्मान वाट्याला येणाऱ्या जगातल्या सर्वात थोर व्यक्तींमध्ये म्हणूनच गांधीजींचं नाव आदराने घेतलं जातं.(File Photo)
फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड हे महात्मा गांधींचे प्रचंड चाहते होते.
(9 / 9)
फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड हे महात्मा गांधींचे प्रचंड चाहते होते.(File Photo (Getty Images))

    शेअर करा