मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  हिंद महासागरात भारतीय नौदलाचा दबदबा! तब्बल १२ तासांच्या मोहिमेनंतर समुद्री चाचांपासून २३ पाकिस्तानींची सुटका

हिंद महासागरात भारतीय नौदलाचा दबदबा! तब्बल १२ तासांच्या मोहिमेनंतर समुद्री चाचांपासून २३ पाकिस्तानींची सुटका

Mar 30, 2024, 08:00 AMIST

Indian navy rescues hijacked Iranian vessel : भारतीय नौदलाने हिंद महासागरातील आपला दबदबा कायम ठेवला आहे. समुद्री चाचांच्या तावडीतून एका इराणच्या जहाजाची सुटका करण्यात आली. १२ तास चाललेल्या या मोहिमेत तब्बल २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली.

  • Indian navy rescues hijacked Iranian vessel : भारतीय नौदलाने हिंद महासागरातील आपला दबदबा कायम ठेवला आहे. समुद्री चाचांच्या तावडीतून एका इराणच्या जहाजाची सुटका करण्यात आली. १२ तास चाललेल्या या मोहिमेत तब्बल २३ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली.
चाचेगिरीचा आणखी एक हल्ला हाणून पाडून भारतीय नौदलाने समुद्रात आपला दबदबा कायम ठेवला आहे. भारतीय नौदलाने शुक्रवारी अरबी समुद्रात अपहृत इराणी मासेमारी जहाज अल-कंबर ७८६ आणि त्याच्या २३  सदस्यीय पाकिस्तानी क्रूची सुरक्षितपणे सुटका केली. १२  तासांपेक्षा अधिक वेळ चाललेल्या या मोहिमेत भारतीय नौदलाच्या कमांडोंनी चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाने समुद्री चाच्यांविरूद्ध १२  तासांहून अधिक काळ चाललेल्या ऑपरेशननंतर ओलिस ठेवलेल्या  इराणी मासेमारी जहाज आणि २३  पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली.
(1 / 5)

नौदलाच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, भारतीय नौदलाचे पथके मासेमारी नौकेची कसून तपासणी करत आहेत. जेणेकरून त्यांना  सुरक्षित ठिकाणी हलवता येईल. भारतीय नौदलाने शुक्रवारी उशिरा सांगितले की ते अपहृत मासेमारी नौकेला वाचविण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.  ज्यावर नऊ सशस्त्र समुद्री चाच्यांनी हल्ला चढवत मासेमारी करणाऱ्यांना ओलिस ठेवले होते. 
(2 / 5)

  नौदलाने शुक्रवारी  या जहाजाला ताब्यात घेतले. ही मोहीम  आयएनएस सुमेधाने राबवली. आयएनएस सुमेधाने  शुक्रवारी पहाटे अपहरण केलेल्या 'अल कंबर' या जहाजाला रोखले. या मोहिमेत आयएनएस त्रिशूलने देखील साथ दिली.  घटनेच्या वेळी मासेमारी जहाज सोकोत्राच्या दक्षिण-पश्चिमेस अंदाजे ९० नॉटिकल मैल दूर होते आणि "सशस्त्र चाच्यांनी त्यावर ताबा मिळवला होता. 
(3 / 5)

भारतीय नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांनी गेल्या शनिवारी म्हटले होते की, हिंदी महासागर अधिक सुरक्षित क्षेत्र बनवण्यासाठी नौदल 'सकारात्मक कारवाई' करेल. यासोबतच नौदलाने गेल्या १०० दिवसांत चाच्यांविरोधात केलेल्या कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. 
(4 / 5)

सोमालियाच्या किनारपट्टीवर नुकत्याच केलेल्या कारवाईत पकडलेल्या ३५ समुद्री चाच्यांना घेऊन युद्धनौका आयएनएस कोलकाता शनिवारी सकाळी मुंबईत पोहोचली. येथे आणल्यानंतर या चोरट्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 'ऑपरेशन संकल्प' अंतर्गत ही कारवाई करण्यात आली, ज्या अंतर्गत या परिसरातून जाणाऱ्या खलाशी आणि मालवाहू जहाजांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाची जहाजे अरबी समुद्र आणि एडनच्या आखातात तैनात करण्यात आली आहेत.
(5 / 5)

    शेअर करा