मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  2024 KTM 390 Duke: जबरदस्त लूकसह केटीएम ३९० ड्यूक बाईक बाजारात दाखल, पाहा फोटो

2024 KTM 390 Duke: जबरदस्त लूकसह केटीएम ३९० ड्यूक बाईक बाजारात दाखल, पाहा फोटो

Aug 23, 2023, 02:16 PMIST

2024 KTM 390 Duke Photo: केटीएम ३९० ड्यूक बाईक नव्या लूक आणि दमदार इंजीनसह जागतिक बाजारात लॉन्च झाली आहे.

केटीएमची 2024 390 Duke स्पोर्ट्स बाईक जागतिक बाजारात लॉन्च झाली आहे. या बाईकमध्ये अनेक व्हिज्युअल अपग्रेड्स देण्यात आले. तसेच इंजिनमध्येही बदल करण्यात आला आहे.  2024 390 Duke पुढच्या वर्षी भारतीय बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
(1 / 6)

यापूर्वी या बाईकमध्ये ३७३ सीसी इंजिन मिळत होते. मात्र, आता ग्राहकांना या बाईकमध्ये ३९८ सीसी इंजिनची ताकद मिळणार आहे. याशिवाय, बीपीएच पॉवर ४४.२५ पर्यंत वाढवली आहे. इंजिन 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
(2 / 6)

ही बाईक नव्या बॉडी पॅनल आणि हेडलाईटमुळे अधिक आकर्षित दिसत आहे. पेट्रोलची टाकी पूर्वीपेक्षा मोठी आहे. हेडलॅम्प युनिट आणि टेल लॅम्प देखील नव्या डिझाईनसह पाहायला मिळत आहे. सिग्नेचर इलेक्ट्रॉनिक ऑरेंज आणि अटलांटिक ब्लू या दोन रंगांमध्ये ही बाईक बाजारात दाखल झाली आहे. 
(3 / 6)

ट्रेलीस फ्रेम प्रेशर डाय-कास्ट अॅल्युमिनियम सबफ्रेम आणि वक्र कास्ट अॅल्युमिनियम स्विंगआर्मसह नवीन आहे. व्हीलबेस थोडा लांब आहे.
(4 / 6)

या बाईकचा सीट-सेटअप नवीन आहे. आधीच्या सीटच्या तुलनेत ते जाड आणि अरुंद आहे. सीटची उंची ८२० मिमी आहे. रायडर पर्याय म्हणून ८०० मिमीचे सीट देखील  लावू शकतो. 
(5 / 6)

एक नवीन 5-इंचाचा TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. रायडर संगीत नियंत्रित करण्यास, इनकमिंग कॉल्स घेण्यास सक्षम असेल.
(6 / 6)

    शेअर करा