मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND vs BAN : भारत आणि बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या मानधनात किती फरक? एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? पाहा

IND vs BAN : भारत आणि बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या मानधनात किती फरक? एका सामन्यासाठी किती पैसे मिळतात? पाहा

Oct 16, 2023, 09:24 PMIST

india and bangladesh cricketers salary : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा पुढील सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, या दोन्ही संघांच्या आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा फरक आहे.

  • india and bangladesh cricketers salary : क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताचा पुढील सामना बांगलादेशशी होणार आहे. हा सामना पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दरम्यान, या दोन्ही संघांच्या आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा फरक आहे.
अगदी तशाच प्रकारे दोन्ही संघांतील खेळाडूंच्या मानधनातही खूप मोठे अंतर आहे. बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंची ज्या प्रकारे ४ गटात विभागणी केली आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश क्रिकेट बोर्डही आपल्या खेळाडूंना ४ श्रेणींमध्ये विभागून दरवर्षी करारबद्ध करते. यामध्ये ए प्लस, ए, बी आणि सी असे ४ ग्रेड आहेत.
(1 / 7)

बीसीसीआयच्या ‘ए प्लस’ श्रेणीतील क्रिकेटपटूंना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. याउलट, BCB आपल्या 'ए प्लस' श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ४८ लाख रुपये देते.
(2 / 7)

भारतीय क्रिकेटपटूंच्या ‘अ श्रेणी’ क्रिकेटपटूंना वर्षाला ५ कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या 'अ श्रेणी' क्रिकेटपटूंना वार्षिक ३६ लाख रुपये मानधन मिळते.
(3 / 7)

बीसीसीआयच्या 'बी श्रेणीतील क्रिकेटपटूंना वार्षिक ३ कोटी रुपये मिळतात. बांगलादेशमध्ये ब श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी २४ लाख रुपये दिले जातात.
(4 / 7)

भारताच्या ‘सी’ श्रेणीतील क्रिकेटपटूंनाही वर्षाला १ कोटी रुपये मिळतात. तर बांगलादेशच्या 'सी श्रेणीतील क्रिकेटपटूंना वर्षाला फक्त १२ लाख रुपये मिळतात.
(5 / 7)

भारत आणि बांगलादेशच्या क्रिकेटपटूंच्या वार्षिक करारात जसा फरक आहे, तसाच त्यांच्या मॅच फीमध्येही मोठा फरक आहे. भारतीय क्रिकेटपटूंना कसोटीसाठी १५ लाख रुपये, वनडेसाठी ६ लाख रुपये आणि टी-20 साठी ३ लाख रुपये मॅच फी मिळते. 
(6 / 7)

तर बांगलादेशच्या क्रिकेटपटूंना कसोटीसाठी ३ लाख रुपये, वनडेसाठी २ लाख आणि टी-20 साठी १ लाख रुपये मॅच फी मिळते.
(7 / 7)

    शेअर करा