मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  IND Vs BAN : विराट कोहलीचं ४८वं शतक, भारताचा बांगलादेशवर शानदार विजय

IND Vs BAN : विराट कोहलीचं ४८वं शतक, भारताचा बांगलादेशवर शानदार विजय

Oct 19, 2023, 10:22 PMIST

ind vs ban world cup highlights : एकदिवसीय विश्वचषकच्या १७ व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.

  • ind vs ban world cup highlights : एकदिवसीय विश्वचषकच्या १७ व्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा ७ गडी राखून पराभव केला आहे. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे.
बांगलादेशच्या २५७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने षटकार मारुन आपले शतक आणि सामना पूर्ण केला. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील ४८ वे शतक आहे. विराट कोहलीने नाबाद १०० धावा केल्या. त्याने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार खेचले. 
(1 / 7)
बांगलादेशच्या २५७ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने षटकार मारुन आपले शतक आणि सामना पूर्ण केला. त्याचे हे वनडे क्रिकेटमधील ४८ वे शतक आहे. विराट कोहलीने नाबाद १०० धावा केल्या. त्याने ९७ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकार खेचले. (REUTERS)
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ८ बाद २५६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून सलामीवीर लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. 
(2 / 7)
बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ८ बाद २५६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून सलामीवीर लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. (ANI )
भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 
(3 / 7)
भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी २ बळी घेतले. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (BCCI Twitter)
बांगलादेशने पहिल्या विकेटसाठी १४.४ षटकांत ९३ धावा जोडल्या. यानंतर ते ३०० हून अधिक धावा करतील, असे वाटत होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि १७९ धावांवर बांगलादेशचे ६ फलंदाज गारद केले. यानंतर महदुल्लाहने एक बाजू लावून धरली आणि संघाला २५० चा आकडा गाठून दिला. त्याने ३६ चेंडूत ३ चौकार ३ षटकारांसह ४६ धावा केल्या.
(4 / 7)
बांगलादेशने पहिल्या विकेटसाठी १४.४ षटकांत ९३ धावा जोडल्या. यानंतर ते ३०० हून अधिक धावा करतील, असे वाटत होते, परंतु भारतीय गोलंदाजांनी शानदार पुनरागमन केले आणि १७९ धावांवर बांगलादेशचे ६ फलंदाज गारद केले. यानंतर महदुल्लाहने एक बाजू लावून धरली आणि संघाला २५० चा आकडा गाठून दिला. त्याने ३६ चेंडूत ३ चौकार ३ षटकारांसह ४६ धावा केल्या.(ANI )
२५७ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२ षटकात ८८ धावा जोडल्या. रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करताना ४० चेंडूत ४८ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि २ षटकार ठोकले.
(5 / 7)
२५७ धावांचा पाठलाग करताना भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धमाकेदार सुरुवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२ षटकात ८८ धावा जोडल्या. रोहित शर्माने तुफानी फलंदाजी करताना ४० चेंडूत ४८ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि २ षटकार ठोकले.(AP)
तर शुभमन गिलनेही ५२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली. शुभमन ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. 
(6 / 7)
तर शुभमन गिलनेही ५२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. विश्वचषकातील आपल्या दुसऱ्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी केली. शुभमन ५५ चेंडूत ५३ धावा करून बाद झाला. (PTI)
भारताचा पुढील सामना न्यूझीलंडशी आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेतआणि विशेष म्हणजे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. अशा परिस्थितीत २२ ऑक्टोबरला होणारा हा सामना खूपच रोमांचक असेल. 
(7 / 7)
भारताचा पुढील सामना न्यूझीलंडशी आहे. दोन्ही संघ गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानांवर आहेतआणि विशेष म्हणजे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. अशा परिस्थितीत २२ ऑक्टोबरला होणारा हा सामना खूपच रोमांचक असेल. (REUTERS)

    शेअर करा