मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Delhi Rain:मुसळधार पावसाने दिल्लीला झोडपलं, जागोजागी ट्राफिक जाम, दिल्लीकर बेहाल

Delhi Rain:मुसळधार पावसाने दिल्लीला झोडपलं, जागोजागी ट्राफिक जाम, दिल्लीकर बेहाल

Jun 30, 2022, 05:26 PMIST

दिल्लीतील मान्सूनच्या पावसाच्या सरींनी शहरातील उष्णतेपासून अत्यंत आवश्यक विश्रांती दिली परंतु अनेक भागात पाणी साचल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.

दिल्लीतील मान्सूनच्या पावसाच्या सरींनी शहरातील उष्णतेपासून अत्यंत आवश्यक विश्रांती दिली परंतु अनेक भागात पाणी साचल्याने आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे हाल झाले.

गुरुवारी दिल्लीत मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने, नव्याने उदघाटन झालेला प्रगती मैदान बोगदा, आयटीओ, रिंग रोड, बारापुल्ला कॉरिडॉर, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे, सराय काले खान यासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी झाली होती.
(1 / 7)
गुरुवारी दिल्लीत मान्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने, नव्याने उदघाटन झालेला प्रगती मैदान बोगदा, आयटीओ, रिंग रोड, बारापुल्ला कॉरिडॉर, दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे, सराय काले खान यासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे तासनतास वाहतूक कोंडी झाली होती.(PTI)
दिल्लीचे शहर क्षेत्र तसेच दिल्ली-नोएडा बॉर्डर, चिल्ला बॉर्डर, यूपी गेट, दिल्ली-गुरुग्राम रोड या सारख्या भागात राष्ट्रीय राजधानीत पावसाने जोरदार हजेरी लावली.
(2 / 7)
दिल्लीचे शहर क्षेत्र तसेच दिल्ली-नोएडा बॉर्डर, चिल्ला बॉर्डर, यूपी गेट, दिल्ली-गुरुग्राम रोड या सारख्या भागात राष्ट्रीय राजधानीत पावसाने जोरदार हजेरी लावली.(PTI)
नवी दिल्लीत पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यावर वाहनं ही अशी बंद पडल्याने उभी असल्याचे पाहायला मिळालं. पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांना पुल प्रल्हादपूर अंडरपास मेहरौली-बदरपूर मार्गावरील वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करावा लागला.
(3 / 7)
नवी दिल्लीत पावसाळ्यात पाणी साचलेल्या रस्त्यावर वाहनं ही अशी बंद पडल्याने उभी असल्याचे पाहायला मिळालं. पाणी साचल्याने वाहतूक पोलिसांना पुल प्रल्हादपूर अंडरपास मेहरौली-बदरपूर मार्गावरील वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करावा लागला.(PTI)
प्रगती मैदान बोगदा, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग, विनोद नगरजवळ, अरबिंदो मार्ग, चिराग दिल्ली उड्डाणपुलाजवळ, पुल प्रल्हादपूर अंडरपास, राव तुला राम उड्डाणपूल, सदर बाजार, एम्स अंडरपास, यासह इतर शहरांमध्ये पाणी साचले आहे.
(4 / 7)
प्रगती मैदान बोगदा, दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्ग, विनोद नगरजवळ, अरबिंदो मार्ग, चिराग दिल्ली उड्डाणपुलाजवळ, पुल प्रल्हादपूर अंडरपास, राव तुला राम उड्डाणपूल, सदर बाजार, एम्स अंडरपास, यासह इतर शहरांमध्ये पाणी साचले आहे.(PTI)
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी, ट्विटद्वारे मुख्य मार्गांवर पाणी साचणे आणि अवजड वाहतुकीबद्दल प्रवाशांना माहिती दिली.
(5 / 7)
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी, ट्विटद्वारे मुख्य मार्गांवर पाणी साचणे आणि अवजड वाहतुकीबद्दल प्रवाशांना माहिती दिली.(PTI)
मान्सूनच्या पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी, वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले.
(6 / 7)
मान्सूनच्या पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी, वाहतूक कोंडी आणि पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल झाले.(PTI)
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) एक केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे जिथून दिल्लीतील १० प्रमुख पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर CCTV कॅमेऱ्यांद्वारे 24X7 लक्ष ठेवले जात आहे.
(7 / 7)
सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) एक केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे जिथून दिल्लीतील १० प्रमुख पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर CCTV कॅमेऱ्यांद्वारे 24X7 लक्ष ठेवले जात आहे.(PTI)

    शेअर करा