मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Wildlife Photo : निष्णात हार्ट सर्जनच्या कॅमेऱ्याने टिपली जंगलाची स्पंदनं

Wildlife Photo : निष्णात हार्ट सर्जनच्या कॅमेऱ्याने टिपली जंगलाची स्पंदनं

Nov 27, 2023, 03:58 PMIST

मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांनी कॅमेऱ्यातून टिपलेल्या जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे ‘हार्टबिट्स’ या वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.

मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांनी कॅमेऱ्यातून टिपलेल्या जंगली प्राणी आणि पक्ष्यांचे ‘हार्टबिट्स’ या वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते.
मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे हृदय शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांच्या ‘हार्टबिट्स’ या वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हृदय शल्यचिकित्सक असलेले डॉ. पांडा सिद्धहस्त छायाचित्रकार आहेत. 
(1 / 5)
मुंबईत जहांगीर आर्ट गॅलरी येथे हृदय शल्यचिकित्सक डॉ. रमाकांत पांडा यांच्या ‘हार्टबिट्स’ या वाईल्डलाईफ फोटोग्राफीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हृदय शल्यचिकित्सक असलेले डॉ. पांडा सिद्धहस्त छायाचित्रकार आहेत. ( फोटोः डॉ. रमाकांत पांडा)
मुंबईतील जहांगीर कला दालनात आयोजित करण्यात आलेल्या ‘हार्टबीट्स’ या प्रदर्शनात मुंबईलगतचे कर्नाळा पक्षी अभयारण्य, मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्प, बांधवगढ राष्ट्रीय अभयारण्यापासून केनियातील जंगलात जाऊन विविध रंगांचे पक्षी, वाघ, सिंह, चित्ते, हत्ती, काळवीटचे फोटो टिपले आहेत.
(2 / 5)
मुंबईतील जहांगीर कला दालनात आयोजित करण्यात आलेल्या ‘हार्टबीट्स’ या प्रदर्शनात मुंबईलगतचे कर्नाळा पक्षी अभयारण्य, मध्य प्रदेशातील कान्हा व्याघ्र प्रकल्प, बांधवगढ राष्ट्रीय अभयारण्यापासून केनियातील जंगलात जाऊन विविध रंगांचे पक्षी, वाघ, सिंह, चित्ते, हत्ती, काळवीटचे फोटो टिपले आहेत.( फोटोः डॉ. रमाकांत पांडा)
या प्रदर्शनात जंगलात पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांचे देखणे फोटो प्रदर्शनात मांडले आहेत. यात वाघ, बिबळ्या, तरस, जिराफ, मुंगुस, झेब्राची पाण्यात पडलेली प्रतिबिंबे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक फोटोसोबत त्या फोटोबाबत आणि प्राण्याबाबत अधिक माहिती दिलेली आहे.
(3 / 5)
या प्रदर्शनात जंगलात पाणवठ्यावर आलेल्या प्राण्यांचे देखणे फोटो प्रदर्शनात मांडले आहेत. यात वाघ, बिबळ्या, तरस, जिराफ, मुंगुस, झेब्राची पाण्यात पडलेली प्रतिबिंबे लक्ष वेधून घेतात. प्रत्येक फोटोसोबत त्या फोटोबाबत आणि प्राण्याबाबत अधिक माहिती दिलेली आहे.( फोटोः डॉ. रमाकांत पांडा)
मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ‘द एशियन वाइल्डलाइफ ट्रस्ट’ उभारण्यात आला असून फोटो प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून जंगलात काम करणारे कर्मचारी आणि जंगल संवर्धनाच्या कामासाठी निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पांडा यांनी दिली. यात प्राण्यांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका, कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये अन्नपुरवठा, आदिवासी महिलांना शिवणयंत्राचे वाटप, सफारीसाठी वाहने खरेदी करणे इत्यादी कामे करण्यात येतात. 
(4 / 5)
मुंबईच्या एशियन हार्ट इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून ‘द एशियन वाइल्डलाइफ ट्रस्ट’ उभारण्यात आला असून फोटो प्रदर्शन आणि विक्रीच्या माध्यमातून जंगलात काम करणारे कर्मचारी आणि जंगल संवर्धनाच्या कामासाठी निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पांडा यांनी दिली. यात प्राण्यांच्या उपचारासाठी रुग्णवाहिका, कर्मचाऱ्यांना पावसाळ्यामध्ये अन्नपुरवठा, आदिवासी महिलांना शिवणयंत्राचे वाटप, सफारीसाठी वाहने खरेदी करणे इत्यादी कामे करण्यात येतात. ( फोटोः डॉ. रमाकांत पांडा)
डॉ. रमाकांत पांडा हे मुंबई शहरातील निष्णात हार्ट सर्जन असून मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे ग्रूप सीईओ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पांडा यांनी गेली अनेक वर्ष भारतातील तसेच परदेशातील जंगलांचा दौरा करून प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक फोटो काढले आहेत.
(5 / 5)
डॉ. रमाकांत पांडा हे मुंबई शहरातील निष्णात हार्ट सर्जन असून मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल येथील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे ग्रूप सीईओ म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पांडा यांनी गेली अनेक वर्ष भारतातील तसेच परदेशातील जंगलांचा दौरा करून प्राणी आणि पक्ष्यांचे अनेक फोटो काढले आहेत.

    शेअर करा