मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Roger Federer: टेनिस सम्राट फेडरर लहान मुलासारखा रडला! पाहा हेलावून टाकणाऱ्या क्षणाचे Photo

Roger Federer: टेनिस सम्राट फेडरर लहान मुलासारखा रडला! पाहा हेलावून टाकणाऱ्या क्षणाचे Photo

Sep 24, 2022, 12:59 PMIST

१९ वर्षाची झळाळती कारकीर्द अखेर थांबली. आपण टेनिसमधून निवृत्त होतोय असं सांगताना ज्याला अश्रू अनावर झाले, पाहा टेनिसच्या राजाने रॉडर फेडररने जेव्हा आपल्या कारकीर्दीला दिला पूर्णविराम.

१९ वर्षाची झळाळती कारकीर्द अखेर थांबली. आपण टेनिसमधून निवृत्त होतोय असं सांगताना ज्याला अश्रू अनावर झाले, पाहा टेनिसच्या राजाने रॉडर फेडररने जेव्हा आपल्या कारकीर्दीला दिला पूर्णविराम.
टेनिसच्या क्षितीजावर अनेक नावं चमकत्या ताऱ्यासारखी आहेत पण अढळ स्थान फार कमी जणांच्या नशीबी येतं. त्यातलं एक नाव रॉजर फेडरर. २० ग्रॅन्डस्लॅम विजेता आणि आपल्या कारकीर्दीत आणखीनही काही विजेतेपद तो मिळवू शकला असता पण त्याच्या शरीराला ते मान्य नव्हतं. सतत गुडघ्यावर होत असलेल्या शस्त्रक्रियांनी फेडरर जेरीस आला होता. गेली काही वर्ष त्याने हातात रॅकेट घेतली नव्हती. आपण निवृत्त होत आहोत हे सांगताना ढसाढसा रडला फेडरर.
(1 / 8)
टेनिसच्या क्षितीजावर अनेक नावं चमकत्या ताऱ्यासारखी आहेत पण अढळ स्थान फार कमी जणांच्या नशीबी येतं. त्यातलं एक नाव रॉजर फेडरर. २० ग्रॅन्डस्लॅम विजेता आणि आपल्या कारकीर्दीत आणखीनही काही विजेतेपद तो मिळवू शकला असता पण त्याच्या शरीराला ते मान्य नव्हतं. सतत गुडघ्यावर होत असलेल्या शस्त्रक्रियांनी फेडरर जेरीस आला होता. गेली काही वर्ष त्याने हातात रॅकेट घेतली नव्हती. आपण निवृत्त होत आहोत हे सांगताना ढसाढसा रडला फेडरर.(AP)
या दोघांना कायम टेनिस जगतात आदराचं स्थान मिळेल. येणाऱ्या पिढ्याही यांच्या पराक्रमाने प्रेरीत होतील असे हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल आणि रॉजर फेडरर.लेव्हर कपच्या निमित्ताने दोघं युरोपला रिप्रेझेंट करत होती.
(2 / 8)
या दोघांना कायम टेनिस जगतात आदराचं स्थान मिळेल. येणाऱ्या पिढ्याही यांच्या पराक्रमाने प्रेरीत होतील असे हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदाल आणि रॉजर फेडरर.लेव्हर कपच्या निमित्ताने दोघं युरोपला रिप्रेझेंट करत होती.(AFP)
या दोघांनी अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांसमोर कडवी झुंज दिली मात्र या सामन्यात त्यांना ४-६, ७-६,११-९ असा पराभव पत्करावा लागला.डबल्समध्ये फेडरर फारसा रमलेला दिसलाच नाही. तो कायमच एकेरीचा बादशाह राहिला. सामन्याच्या एका महत्वाच्या क्षणी रॉजर फेडरर.
(3 / 8)
या दोघांनी अमेरिकेच्या प्रतिस्पर्ध्यांसमोर कडवी झुंज दिली मात्र या सामन्यात त्यांना ४-६, ७-६,११-९ असा पराभव पत्करावा लागला.डबल्समध्ये फेडरर फारसा रमलेला दिसलाच नाही. तो कायमच एकेरीचा बादशाह राहिला. सामन्याच्या एका महत्वाच्या क्षणी रॉजर फेडरर.(AFP)
नोव्हाक जोकोविचही यावेळेस काहीसा भावूक झाला होता. फेडरर म्हणजे टेनिस असं समीकरण गेली काही वर्ष बनलं होतं. या खेळाने मला सर्वकाही दिलं. मी समाधानी आहे असं फेडरर म्हणाला खरा मात्र आणखी काही वर्ष तो आरामात खेळू शकला असता आणि त्यानं या खेळावर तितकीच हुकूमत गाजवली असती असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.
(4 / 8)
नोव्हाक जोकोविचही यावेळेस काहीसा भावूक झाला होता. फेडरर म्हणजे टेनिस असं समीकरण गेली काही वर्ष बनलं होतं. या खेळाने मला सर्वकाही दिलं. मी समाधानी आहे असं फेडरर म्हणाला खरा मात्र आणखी काही वर्ष तो आरामात खेळू शकला असता आणि त्यानं या खेळावर तितकीच हुकूमत गाजवली असती असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.(AP)
फेडरर म्हणजे नैसर्गिक खेळाचा झरा. नैसर्गिक देणगी लाभलेला एक अलौकीक खेळाडू. असं नशीब फार कमी लोकांच्या भाग्याला येतं.मात्र तरीही फेडररने युवा टेनिसपटूंच्या मानधनासाठी केलेले प्रयत्न, खेळाडूंची बांधलेली मोट या ऑफ द कोर्ट गोष्टींमुळेही फेडरर सर्वांच्याच गळ्यातला ताईत आहे. त्याला दिलेलं हे फेअरवेल सारंकाही सांगून जातं.
(5 / 8)
फेडरर म्हणजे नैसर्गिक खेळाचा झरा. नैसर्गिक देणगी लाभलेला एक अलौकीक खेळाडू. असं नशीब फार कमी लोकांच्या भाग्याला येतं.मात्र तरीही फेडररने युवा टेनिसपटूंच्या मानधनासाठी केलेले प्रयत्न, खेळाडूंची बांधलेली मोट या ऑफ द कोर्ट गोष्टींमुळेही फेडरर सर्वांच्याच गळ्यातला ताईत आहे. त्याला दिलेलं हे फेअरवेल सारंकाही सांगून जातं.(AP)
 एकंदरीत १०३ टायटल्स ज्याने आपल्या अंगाखांद्यावर मिरवले असा एकमेवाद्वितीय रॉजर फेडरर. सर्वात जास्त विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करणारा ग्रास कोर्टचा सम्राट.त्याच्या शेजारी लांब केस असलेला टेनिसचा नवा उदयास येत असलेला तारा ग्रीसचा स्टिफनोस त्सित्सिपास.
(6 / 8)
 एकंदरीत १०३ टायटल्स ज्याने आपल्या अंगाखांद्यावर मिरवले असा एकमेवाद्वितीय रॉजर फेडरर. सर्वात जास्त विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम करणारा ग्रास कोर्टचा सम्राट.त्याच्या शेजारी लांब केस असलेला टेनिसचा नवा उदयास येत असलेला तारा ग्रीसचा स्टिफनोस त्सित्सिपास.(AP)
आपल्या महान खेळाने आणि नम्र स्वभावाने फेडरर कायमच स्मरणात राहील. एखाद्या गोष्टीवर प्रेम किती आणि कसं करावं याची दोन उदाहरणं जगाने पाहिली, एकदा सचिन तेंडुलकर निवृत्त होताना आणि आता रॉजर फेडरर निवृत्त होताना. १९८० च्या दरम्यान जन्माला आलेल्या सर्व क्रीडा प्रेमींना या दोन अवलियांना पाहाता आलं.फेड एक्स्पेस थांबली.
(7 / 8)
आपल्या महान खेळाने आणि नम्र स्वभावाने फेडरर कायमच स्मरणात राहील. एखाद्या गोष्टीवर प्रेम किती आणि कसं करावं याची दोन उदाहरणं जगाने पाहिली, एकदा सचिन तेंडुलकर निवृत्त होताना आणि आता रॉजर फेडरर निवृत्त होताना. १९८० च्या दरम्यान जन्माला आलेल्या सर्व क्रीडा प्रेमींना या दोन अवलियांना पाहाता आलं.फेड एक्स्पेस थांबली.(AP)
प्रतिस्पर्धी असावा तर तो फेडरर सारखा असं कायम राफेल नदाल म्हणतो. मी भाग्यवान आहे की मला असा टेनिसमधला प्रतिस्पर्धी मिळाला, सर्वांच्या नशीबी हे भाग्य येत नाही असे उदगार नदालने कायमचं दोघांच्या अंतिम सामन्यानंतर काढले आहेत. दोन कट्टर प्रतिस्पर्धी होते मात्र दोघांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम कायम राहिलं. त्यामुळेच की काय फेडररच्या शेजारी बसलेला नदालही भावूक झाला होता. अलविदा फेडरर. इतकी वर्ष आम्हाला उच्च दर्जाचा खेळ आणि विनम्र स्वभावाचा माणूस दिल्याबद्दल.
(8 / 8)
प्रतिस्पर्धी असावा तर तो फेडरर सारखा असं कायम राफेल नदाल म्हणतो. मी भाग्यवान आहे की मला असा टेनिसमधला प्रतिस्पर्धी मिळाला, सर्वांच्या नशीबी हे भाग्य येत नाही असे उदगार नदालने कायमचं दोघांच्या अंतिम सामन्यानंतर काढले आहेत. दोन कट्टर प्रतिस्पर्धी होते मात्र दोघांमध्ये एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम कायम राहिलं. त्यामुळेच की काय फेडररच्या शेजारी बसलेला नदालही भावूक झाला होता. अलविदा फेडरर. इतकी वर्ष आम्हाला उच्च दर्जाचा खेळ आणि विनम्र स्वभावाचा माणूस दिल्याबद्दल.(AFP)

    शेअर करा