मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  ENG vs NZ : विल्यमसन ते स्टोक्स! विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधीच हे सुपरस्टार जखमी

ENG vs NZ : विल्यमसन ते स्टोक्स! विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याआधीच हे सुपरस्टार जखमी

Oct 05, 2023, 05:21 PMIST

ENG vs NZ, ICC World 2023 Cup : विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा उद्घाटनाचा सामना सुरू आहे. सामन्यात दोन्ही संघांचे ५ मोठे खेळाडू खेळत नाहीत. यात इंग्लंडचा बेन स्टोक्स, न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

  • ENG vs NZ, ICC World 2023 Cup : विश्वचषकाचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा उद्घाटनाचा सामना सुरू आहे. सामन्यात दोन्ही संघांचे ५ मोठे खेळाडू खेळत नाहीत. यात इंग्लंडचा बेन स्टोक्स, न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.
यातील तीन खेळाडू बेन स्टोक्स, विल्यमसन, साऊथी आणि फर्ग्युसन दुखापतीमुळे बाहेर आहेत. क्रिकेट विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात जोस बटलरच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून इंग्लिश संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
(1 / 7)

न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज टीम साऊथीही या सामन्यासाठी फिट नाही. इंग्लंड दौऱ्यावर झेल घेताना त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. 
(2 / 7)

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनही विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यातून बाहेर आहे. त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्याला कोणत्या प्रकारची दुखापत झाली हे स्पष्ट झाले नाही.
(3 / 7)

भारतीय वंशाचा किवी फिरकीपटू ईश सोधीला वगळण्याचे कारण सांघिक संयोजन मानले जात आहे. ईशच्या जागी न्यूझीलंडने मिशेल सँटनरची एकमेव स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज म्हणून निवड केली. सँटनेरच्या जागी भारतीय वंशाच्या रचिन रवींद्रला संघात संधी देण्यात आली.
(4 / 7)

केन विल्यमसन आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा कर्णधार आहे, पण आयपीएलमध्ये तो जखमी झाला होता. यानंतर तो बरा झाला पण त्याचा फिटनेस सामना खेळण्याइतका चांगला नाहीये. पहिल्या सराव सामन्यात विल्यमसनने फलंदाजी केली. पण हा सामन्यातून तो बाहेर आहे. त्याच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळत आहे.
(5 / 7)

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्यात बेन स्टोक्सदेखील  खेळत नाहीये. त्याला दुखापत झाली आहे. कर्णधार बटलरने सांगितले की, तो या सामन्यात खेळणार नाही. बेन जखमी झाला आहे. पहिल्या सामन्यात स्टोक्स न खेळणे आणि दुखापत होणे हा इंग्लंडसाठी मोठा धक्का आहे.
(6 / 7)

odi world cup injured players list 
(7 / 7)
odi world cup injured players list 

    शेअर करा